Ira Khan and Nupur Shikhare Wedding Reception: आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकली. ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर १० जानेवारीला आयरा-नुपूरने ख्रिश्चन पद्धतीने लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर १३ जानेवारीला आयरा-नुपूरच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेतेमंडळी पाहायला मिळाले. यासंबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. पण यामधील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबरोबर रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

१३ जानेवारीला मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या बॉलरूममध्ये आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या पार्टीला आमिरने बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित केलं होतं. तसेच बऱ्याच मराठी कलाकारांनी कुटुंबीयांबरोबर या पार्टीला हजेरी लावली होती. शिवाय राजकीय नेते मंडळी देखील पाहायला मिळाले. यादरम्यान ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरन पतीबरोबर रोमँटिक अंदाजात दिसली.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Fame prithvik Pratap share funny video with wife
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
marathi actor siddharth khirid propose to girlfriend in goa
दोन देश, दोघांचं करिअरही वेगळं…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्यात घातली लग्नाची मागणी; म्हणाला, “२२ एप्रिल २०२२…”

हेही वाचा – Video: “लहान मुलांना तरी सोडा…”, पापाराझींना पाहून रितेश देशमुख वैतागला, व्हिडीओ व्हायरल

आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीतील श्रिया सरनचा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये श्रिया पती आंद्रेई कोस्चिवबरोबर लिपलॉक करताना दिसत आहे. तसेच त्यानंतर दोघं एकमेकांच्या गालावर किस देताना पाहायला मिळत आहे. श्रियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

श्रियाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “तर तू २ ऑक्टोबर हे करत होतीस?” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “वनस मोअर, वनस मोअर करायला हे काही सकर्स आहे का?” अशा अनेक प्रतिक्रिया श्रियाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – “हे मृगजळ आहे”, तेजश्री प्रधानने सांगितलं यश म्हणजे काय? सल्ला देत म्हणाली…

याआधीही श्रिया कधी विमानतळावर, तर कधी इन्व्हेंटमध्ये पतीबरोबर रोमँटिक अंदाजात पाहायला मिळाली होती. दरम्यान, श्रिया ‘दृश्यम’ व्यतिरिक्त अनेक चित्रपटात झळकली आहे. हिंदीसह तिने तेलुगू, तमिळ सिनेसृष्टीत काम केलं आहे.

Story img Loader