अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘दृश्यम २’ चित्रपट त्यांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे चर्चेत आहे. तर चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रिया सरन वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. एका कार्यक्रमात श्रियाने तिच्या पतीला लिपलॉक केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा एअरपोर्टवर ती पतीला ओठांवर किस करताना दिसून आली. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं.
दोन दिवसांपूर्वी श्रीयाला तिच्या पतीसह एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी श्रियाने पापराझींसमोर फोटोसोठी पोझ देत पतीला ओठांवर किसही केलं. तिचा हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये श्रिया तिचा पती आंद्रेई कोस्विचला किस करताना दिसत होती. त्यापूर्वी तिचा आणखी एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर “पती-पत्नी किस करतात, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. कॅमेरासमोर असं करण्याची काय गरज आहे?”, “दोघे मुद्दाम कॅमेरासमोर असं करत आहेत” अशा कमेंट्स करत नेटकरी त्यांना ट्रोल करत होते. आता अभिनेत्रीने खुद्द या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – Video: ‘दृश्यम २’ फेम अभिनेत्रीचा पतीसह लिपलॉक करतानाचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात…
श्रियाला तिच्या पतीने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये किस केल्यावर वारंवार होणाऱ्या ट्रोलिंगचा सामना करण्याबद्दल विचारण्यात आलं. श्रिया न्यूज18 शी संवाद साधताना म्हणाली, “माझ्या खास क्षणी मला किस करणं माझ्या पतीला नॉर्मल वाटतं आणि ते सुंदर आहे, असं मला वाटतं. अशा नॅचरल गोष्टींवरून का ट्रोल केलं जातं हेच आंद्रेईला कळत नाही,” असं तिने सांगितलं. ट्रोलिंगला कशाप्रकारे सामोरी जातेस याबद्दल विचारलं असता श्रिया म्हणाली, “मी वाईट कमेंट्स वाचत नाही आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया देत नाही. वाईट कमेंट्स लिहिणं हे त्यांचं (ट्रोल्सचं) काम आहे आणि माझं काम त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आहे. त्यामुळे मी फक्त मला जे करायचे आहे तेच करते.”
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
श्रियाचा ‘दृश्यम २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. चित्रपट अवघ्या पाच दिवसांत जवळपास १०० कोटींच्या घरात पोहोचलाय. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, रजत कपूर, इशिता दत्ता आणि अक्षय खन्ना यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २०१५च्या क्राईम थ्रिलर ‘दृश्यम’ चा सिक्वेल आहे.