अभिनेत्री श्रुती हासनने एका फ्लाइटच्या उशीर होण्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सोशल मीडियावर नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. तिने या अनुभवाबद्दल ट्वीट करताना सांगितले की, चार तासांच्या विलंबानंतरही एका नामांकित एअरवेज कडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. श्रुती हासनच्या या ट्वीटवर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया देत विमान कंपनीच्या ग्राहक सेवेबाबत नाराजी व्यक्त केली.

श्रुती हासनचा संताप

श्रुतीने ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) एका नामांकित एअरवेजच्या सेवेला उद्देशून ट्वीट केले. ती म्हणाली, “मी नेहमी कोणत्याही गोष्टीची सहसा तक्रार करीत नाही; पण आज एका नामांकित एअरवेज कंपनीने फारच गोंधळ घातला आहे. आम्ही चार तासांपासून विमानतळावर अडकलो आहोत आणि अजूनही कोणतीही माहिती मिळालेली नाही. कृपया, तुमच्या प्रवाशांसाठी योग्य आणि स्पष्ट माहिती द्यावी.”

हेही वाचा…“माझ्या वडिलांनी मिस इंडियासाठी बिकिनी खरेदीसाठी माझ्याबरोबर येण्याचा धरला होता आग्रह”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला किस्सा…

या ट्वीटनंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या पोस्टला रीट्वीट करीत विमान कंपनीला त्यांच्या सेवेबद्दल जाब विचारला.

श्रुतीने ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) एका नामांकित एअरवेजच्या सेवेला उद्देशून ट्वीट केले.(Photo Credit – Shruti Hassan X Account)

एअरलाइन्सची प्रतिक्रिया

श्रुती हासनच्या ट्वीटला उत्तर देताना विमान कंपनीने म्हटले, “मॅडम हासन, फ्लाइटच्या विलंबामुळे झालेल्या गैरसोईबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत. आम्हाला समजते की, इतका वेळ वाट पाहणे खूप त्रासदायक असते. हा विलंब मुंबईतील हवामानामुळे झाला आहे; ज्याचा परिणाम विमानाच्या आगमनावर होत आहे.”

हेही वाचा…“तुम्ही मला राष्ट्रीय पुरस्कार…”, वडील महेश भट्ट यांच्याकडे आलिया भट्टने केलेली ‘ही’ मागणी

ते पुढे म्हणाले, “आम्हाला आशा आहे की, आपण हे समजून घ्याल की, या परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि आमचे विमानतळावरील कर्मचारी आपल्या सोय आणि मदतीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत.”

हेही वाचा…अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीला दिलेलं भेटीचं निमंत्रण, ती किस्सा सांगत म्हणाली…

श्रुती हासन शेवटची प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार पार्ट १ : सीजफायर’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकांत होते. तसेच जगपती बाबू, बॉबी सिम्हा, श्रिया रेड्डी व टिन्नू आनंद यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘सालार २’ सध्या निर्मिती प्रक्रियेत असून, हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय श्रुती अदिवी सेशबरोबर शेनिल देवच्या ‘डकैत’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.