अभिनेत्री श्रुती हासन ही तिच्या कामापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सुरुवातीपासूनच तिला स्टारकिड म्हणून बॉलिवूडमधील अनेकांनी कमी लेखलं. पण तिने खचून न जाता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता पहिल्यांदाच तिने यावर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रुती हासन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्याचप्रमाणे ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमच मनोरंजन सृष्टीत होणाऱ्या भेदभावाबद्दल किंवा तिला येणाऱ्या अनुभवाबद्दल खुलेपणाने बोलत असते. आता नुकतीच तिने एक मुलाखत दिली. त्यात तिने एक वक्तव्य करत दुःख व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा : “आमची मुलं दरवेळी मीडियाला हात जोडून नमस्कार करतात कारण…” अखेर रितेश-जिनिलीयाने सांगितली यामागची गोष्ट

श्रुती हासन म्हणाली, “माझ्या करिअरच्या सुरुवातीचा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. लोक माझ्याबद्दल वाईट बोलायचे, मला अनेक सल्ले द्यायचे. मी ज्या प्रकारे बोलते ते प्रेक्षकांना कळणार नाही असंही मला सांगण्यात आलं. पण मी जशी आहे तशीच सर्वांसमोर आले. कधीही कोणताही दिखावा केला नाही. मी कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, मी कुणाचेही काम हिसकावून घेतलं नाही. पण तरीही इथल्या लोकांनी मला त्यांच्यातला एक मानलं नाही.”

हेही वाचा : Photos: ब्रेकअपमुळे दारूचं व्यसन अन् करिअरवर दुर्लक्ष; ‘बेस्टसेलर’ वेबसीरिजमधून श्रुती हासनचा कमबॅक

दरम्यान श्रुती हासनच्या आगामी चित्रपटांची यादी मोठी आहे. ती सध्या तिच्या ‘द आय’ या हॉलीवुड चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तर पुढील वर्षी ती प्रभासबरोबरही स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shruti hasaan opens up about her struggle in bollywood rnv