भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल सध्या त्याच्या IPL 2023 मधील कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या गिलने देशभरातील लोकांची मने जिंकली आहे. क्रिकेटबरोबर शुभमनचे वैयक्तिक आयुष्य सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

हेही वाचा : आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिल्या पत्नीने दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “माझी फसवणूक…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर शुभमन गिल आणि बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले होते. दोघांच्या एकत्र डिनरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर पापाराझींना शुभमन-सारा एकत्र विमानतळावर दिसले होते, परंतु आता इन्स्टाग्रामवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा : दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवरील नावात केला मोठा बदल…जाणून घ्या कारण

शुभमन गिल आणि सारा अली खान यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप दोघांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दमदार फॉर्मात असलेल्या शुभमनने साराला सोशल मीडियावर अनफॉलो केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि शुभमनचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला.

हेही वाचा : आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं मराठी ऐकलंत का? ‘पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम पाहून नेटकरी म्हणतात “किरण मॅडम…”

शुभमन-साराने वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांच्या नात्याचे संकेत दिले होते. शुभमनने पंजाबी चॅट शो ‘दिल दिया गल्लान’ मध्ये सर्वात आवडती बॉलीवूड अभिनेत्री म्हणून सारा अली खानचे नाव घेतले होते. त्यानंतर त्याला साराला डेट करीत आहेस का असे विचारल्यावर त्याने “कदाचित हो कदाचित नाही” असे उत्तर दिल्यामुळे दोघे एकमेकांना डेट करीत असलेल्याच्या चर्चांना उधाण आले होते. शुबमन गिलचे हे वक्तव्य ऐकून मुलाखतकार पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाही थक्क झाली आणि तिने पंजाबीमध्ये ‘सारा दा सारा सच बोलो प्लीज’ अशी त्याची खिल्ली उडवली होती.

शुभमन गिल आणि सारा अली खानने केव्हाच उघडपणे त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. दुसरीकडे काही लोकांनी शुभमन गिलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरबरोबरही जोडले आहे. मात्र , याबाबतही अद्याप कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Story img Loader