गेल्या काही दिवसांपासून एकाच चित्रपटाची चर्चा सुरु होती तो चित्रपट म्हणजे ‘विक्रम वेधा’, गेल्या महिन्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पुष्कर आणि गायत्री या दिग्दर्शक जोडीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हृतिकसह सैफ अली खान या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची यशस्वी घोडदौड सध्या सुरु आहे. चित्रपटातील हृतिकच्या कामाचे कौतुकदेखील होत आहे. आयपीलमुळे चर्चेत आलेला क्रिकेटर शुभमन गिलने या चित्रपटाशी संबंधित रील आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. ज्यात तो ईशान किशनचे विक्रम वेधा शैलीत कौतूक करत आहे. हृतिकनेही रीलवर प्रतिक्रिया दिली आणि त्यावर कॉमेंट करत म्हणाला, ‘हाहाहाहा’, रीलच्या कॅप्शनमध्ये गिलने लिहिले, ‘माझे शतक चांगले खेळले’ आणि रीलला चित्रपटाचे पार्श्वसंगीतही वाजवले.

पार्टी असो वा समारंभ…रेखाबरोबर सावलीप्रमाणे असणारी फरजाना आहे तरी कोण?

विक्रम वेधा हा मूळ तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आर माधवन विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होते. २०१७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हिंदी विक्रम वेधाची निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी या चित्रपटाने १०.३० कोटी रुपयांची कमाई केली. एका आठवड्यामध्ये या चित्रपटाचे कलेक्शन ५९ कोटी रुपये इतके झाले. शुक्रवारी या चित्रपटाने २.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘विक्रम वेधा’ने आतापर्यंत भारतामध्ये ७२ कोटी आणि भारताबाहेरील देशांमध्ये ३१ कोटी अशा एकूण १०३ कोटी रुपये कमावले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill praises ishan kishan in vikram vedha signature style hrithik roshan spg
Show comments