Navya Naveli Nanda joins IIM Ahmedabad: महानायक अमिताभ बच्चन यांची नात म्हणजेच श्वेता बच्चन व उद्योगपती निखिल नंदा यांची मुलगी नव्या नवेली नंदा हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करून आनंदाची बातमी दिली आहे. नव्याला देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला आहे. तिने पोस्ट करून तिचं स्वप्न पूर्ण झालंय असं म्हटलं आहे.
बहुतांशी बॉलीवूड कलाकारांची मुलं शिक्षणासाठी परदेशात जातात. पण अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा भारतातील सर्वोच्च संस्थेत प्रवेश घेऊन मॅनेजमेंटचा अभ्यास पूर्ण करणार आहे. नव्याला आयआयएम अहमदाबादमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे. तिने कॅम्पसचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे.
निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”
आयआयएम अहमदाबाद हे देशातील सर्वोच्च एमबीए महाविद्यालय आहे. याठिकाणी प्रवेश मिळवणं सोपं नाही. नव्याने आयआयएम अहमदाबादच्या दोन वर्षांच्या ब्लेंडेड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी (BPGP) प्रवेश घेतला आहे. “स्वप्नं खरी होतात. पुढील दोन वर्षे… उत्तम लोक आणि शिक्षकांबरोबर! Blended Post Graduate Programme (BPGP) Class of 2026,” असं कॅप्शन नव्याने या फोटोंना दिलं आहे. तिच्या फोटोंमध्ये आयआयएम अहमदाबादचा कॅम्पस व तिचे नवीन मित्र-मैत्रिणी दिसत आहेत.
श्वेता बच्चन, सुहाना खान, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, सोनाली बेंद्रे यांनी कमेंट्स करून नव्याला तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रिटींशिवाय चाहत्यांनीदेखील नव्याच्या या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नव्याने आयआयएम अहमदाबादमध्ये दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असून हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे. म्हणजेच नव्या आता दोन वर्षे अहमदाबादमध्ये राहणार आहे.
श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नव्या नवेली नंदाने लंडनच्या सेवेनॉक्स स्कूलमधून तिचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कच्या फोर्डहॅम विद्यापीठात प्रवेश घेतला. नव्याने या विद्यापीठातून डिजिटल टेक्नॉलॉजी आणि यूएक्स डिझाइनमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ती प्रोजेक्ट नवेलीची संस्थापक आहेत. भारतातील लैंगिक असमानतेच्या समस्येशी लढा देण्यासाठी तिने हा एक विशेष उपक्रम सुरू केला.