अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलीवूडमध्ये नेहमीच चर्चेत असतं. सध्या त्यांची नात नव्या नवेली नंदा ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नातीच्या पॉडकास्टमध्ये यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन व नव्याची आई श्वेता नंदा या मायलेकी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात दोघींनी दिलखुलासपणे आपली मतं मांडली. याशिवाय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या अनेक सवयींबद्दल या दोघींनी या कार्यक्रमात खुलासा केला.

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट सीरिजच्या नवीन एपिसोडमध्ये तिची आई श्वेता बच्चन नंदा हिने तिच्या बालपणातील काही जुन्या गोष्टी सांगितल्या आहेत.

हेही वाचा : Video : “तुझा आवडता दागिना कोणता?” पती सिद्धार्थ चांदेकरचं उत्तर ऐकून मिताली मयेकर भारावली, दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

अभिषेक व श्वेता यांची बालपणी एकमेकांशी खूप भांडणं व्हायची. लहानपणी भांडणं झाल्यावर एकदा अभिषेकने बहिणीचे केस कापले होते. असा खुलासा जया बच्चन यांनी केला. तसेच बिग बींना कुटुंबातील महिलांचे लहान केस आवडत नव्हते. असं यावेळी श्वेताने सांगितलं ती म्हणाली, “लहानपणी मी छोटे केस (शॉर्ट हेअर्स) ठेवायचे किंवा वरचेवर केस कापायचे. पण, माझ्या वडिलांना ते आवडायचं नाही. ते नाराज व्हायचे, माझ्यावर रागावायचे.”

हेही वाचा : वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ‘अ‍ॅनिमल’ फेम रश्मिका मंदानाची मोठी कामगिरी! पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबद्दल सांगताना श्वेता नंदा पुढे म्हणाली, “जेव्हा मी केस कापून घरी यायचे तेव्हा मला बाबा, “तू एवढे लहान केस का कापलेस?” असं विचारायचे. कारण, पहिल्यापासून त्यांना मोठे, लांबसडक केस आवडायचे. आमच्यापैकी कोणीही केस कापलेले त्यांना आवडायचं नाही.”

याशिवाय “पूर्वी तुम्ही मॉइश्चरायझर ( moisturiser) म्हणून काय वापरायचा?” असा प्रश्न नव्याने आजी जया बच्चन यांना विचारला, यावर अभिनेत्री म्हणाल्या, “मोहरीचं तेल ( Mustard oil)…त्यांना आधीपासून हे तेल शरीरासाठी उत्तम मॉइश्चरायझर वाटतं. यूपीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला हे तेल आवडतं. त्यामुळे हे तेल वापरणं ही त्यांची फार पूर्वीपासून सवय आहे.”