अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) व तिचा पती अभिषेक बच्चन वेगळे राहत आहेत, असं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या लेक आराध्याला घेऊन आई वृंदा रॉय यांच्याबरोबर राहतेय तर अभिषेक आई-वडिलांबरोबर राहत आहे. काही महिन्यांपूर्वीच ऐश्वर्याने सासर सोडलं, अशा चर्चा आहेत. दोघांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या या चर्चा अफवा आहेत की सत्य याबाबत ते दोघे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ऐश्वर्या व तिची नणंद श्वेता बच्चन (Shweta Bachchan) यांच्यात वाद असल्याच्या बातम्या येत राहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक बच्चन त्याचे वडील अमिताभ बच्चन, आई जया बच्चन, बहीण श्वेता, तिचे पती निखिल नंदा, त्यांची मुलं अगस्त्य नंदा व नव्या नवेली नंदा यांच्याबरोबर आला होता. तर ऐश्वर्या मात्र लेक आराध्याला घेऊन नंतर या लग्नाला आलेली. तेव्हाही ऐश्वर्या व अभिषेक यांच्या नात्याची खूप चर्चा झाली. त्यांनी ग्रे डिव्हॉर्स घेतला आहे, असं म्हटलं जातंय. ऐश्वर्या व श्वेता बच्चन यांचं एकमेकींशी बिनसलं आहे, अशीही चर्चा आहे. पण एकेकाळी श्वेताला ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड खूप आवडायचा.

१९ वर्षांचा संसार, बॉलीवूड अभिनेत्रीने पतीचं आडनाव हटवलं अन् चित्रपट झाला सुपरहिट; म्हणाली…

श्वेता बच्चन हिने स्वतःच याबाबत खुलासा केला होता. अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता सिनेइंडस्ट्रीत आली नाही, ती अभिनयापासून दूर राहिली पण बॉलीवूडमध्ये तिचे अनेक मित्र आहेत. ती तिच्या आई-वडिलांबरोबर चित्रपटाच्या सेटवर जायची जिथे अनेक स्टार्स तिचे मित्र झाले. श्वेताला एक बॉलीवूड अभिनेता खूप आवडायचा. तो तिचा क्रश होता व तो तिच्या वहिनीचा म्हणजेच ऐश्वर्याचा एक्स बॉयफ्रेंड आहे. सलमान खान श्वेताचा क्रश होता आणि तिनेच एकदा याचा खुलासा केला होता.

लग्नाला झाली १० वर्षे, आई होऊ शकत नाहीये प्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “माझ्या अन् पतीच्या वयातील अंतरामुळे…”

श्वेता बच्चन करण जोहरच्या शोमध्ये काय म्हणाली होती?

श्वेता बच्चन एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये गेली होती. या शोमध्ये तिने सलमान खानवर क्रश असल्याचं सांगितलं होतं. श्वेता म्हणाली होती की ती अनेकदा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत सेटवर जायची, त्यामुळे ती सलमानची फॅन झाली. करणने त्याच्या शोमध्ये श्वेताला हॉटनेसनुसार कलाकारांना रँक करण्यास सांगितलं होतं. ज्यात श्वेताने सर्वात आधी सलमान खानचं नाव घेतलं होतं. तिला सलमानचं इतकं वेड होतं की ती त्याची ‘मैंने प्यार किया’ टोपी घालून झोपायची. ही टोपी श्वेतासाठी तिचा भाऊ अभिषेकने आणली होती.

‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील एक सीन (फोटो- स्क्रीनशॉट)

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

श्वेताची वहिनी ऐश्वर्या रायने सलमान खानला डेट केले आहे. दोघेही दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण हे नातं अत्यंत वाईट पद्धतीने संपलं. त्यानंतर ऐश्वर्या व अभिषेक बच्चन भेटले, दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यावर २००७ मध्ये लग्न केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shweta bachchan had crush on aishwarya rai ex salman khan hrc