बॉलिवूडमधील सर्वात लाडके आणि लोकप्रिय कुटुंब म्हणून बच्चन कुटुंबाला ओळखले जाते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, श्वेता बच्चन आणि आराध्या बच्चन हे कायमच चर्चेत असतात. बच्चन कुटुंबिय अनेकदा बॉलिवूडच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन-नंदा हिने प्रसिद्धी चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली. यावेळी मेकअपमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी गुरुवारी २ मार्च रोजी ‘मेरा नूर है मशहूर’ यांच्या नव्या फॅशन चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी सोनाली बेंद्रे ही तिच्या पतीसोबत पोहोचली. तर जया बच्चन, नीतू कपूर, अर्सलन गोनी, सुझान खान, बाबील, उर्फी जावेद, हुमा कुरेशी, राधिका मर्चंट, श्वेता बच्चन नंदा हे कलाकार उपस्थित होते. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा : “माझ्या मुलांनी माझ्यासारखे होऊ नये कारण…” अमिताभ बच्चन यांची लेक श्वेताने केला खुलासा
यातील एका व्हिडीओत श्वेता बच्चन या ग्लॅमरस लूकमध्ये फोटोग्राफर्सला पोज देताना दिसत आहे. यावेळी श्वेता बच्चनने एक वनपीस परिधान केला होता. त्याबरोबर तिने डायमंड इअरिंग्स आणि केसांची साधी हेअरस्टाईल केली होती. यावेळी श्वेता बच्चनने केलेल्या मेकअपमुळे त्या ट्रोल झाल्या. श्वेता बच्चनने तिच्या चेहऱ्यावर फार उत्तम मेकअप केला होता. मात्र तिने हातावर अजिबात मेकअप केला नव्हता. त्यामुळे तिच्या हात आणि चेहऱ्याचा रंग वेगवेगळा दिसत होता. यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले.
आणखी वाचा : “…तेव्हा माझे रक्त सळसळते” अभिषेकची सातत्याने बिग बींशी होणाऱ्या तुलनेवर श्वेताचा संताप
नुकतंच श्वेता बच्चनचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. “कृपया यापुढे हात आणि शरीराच्या इतर भागावरही सनस्क्रीन लावा. कारण तुमचा चेहरा आणि इतर शरीराच्या रंगात साम्य दिसत नाही”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. “हात आणि तोंड यांच्यात अजिबात साम्य नाही. चेहऱ्यावर किती फाऊंडेशन लावलं आहे आणि हात मात्र तसेच ठेवले आहे”, अशी कमेंटही एकाने केली आहे.