बॉलिवूडमधील सर्वात लाडके आणि लोकप्रिय कुटुंब म्हणून बच्चन कुटुंबाला ओळखले जाते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, श्वेता बच्चन आणि आराध्या बच्चन कायमच चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल विविध गोष्ट जाणून घेण्यासाठी लोक फार उत्सुक असतात. नुकतंच अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये त्यांच्या कुटुंबियांबद्दल अनेक गोष्टींबद्दल उलगडा करण्यात आला. यावेळी श्वेता बच्चन-नंदा सहभागी झाली होती. तिने या कार्यक्रमात अभिषेक बच्चनला ट्रोल केले जाण्याबद्दल स्पष्ट शब्दात उत्तर दिले. तसेच अभिषेक आणि तिच्या वडिलांची वारंवार होणारी तुलना याबद्दलही तिने मौन सोडले.
नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये तिने बच्चन कुटुंबियांचे प्रसारमाध्यमांशी असलेले संबंध यावर भाष्य केले. त्यावेळी तिची आई श्वेता बच्चन सहभागी झाली होती. यावेळी श्वेताला बच्चन कुटुंबियांबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिला तिचा भाऊ अभिषेक बच्चन याला होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “अभिषेकची तुलना माझे वडील अमिताभ बच्चन यांच्याबरोबर करणे चुकीचे आहे. माझ्या कानावर जेव्हा या गोष्टी पडतात तेव्हा माझे रक्त सळसळते. अशा ट्रोलिंगमुळे माझ्या भावाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.”
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण
“अभिषेक हा अनेकदा ट्रोलर्सला फार मजेशीररित्या उत्तर देत असतो. त्याचे म्हणणं असते की स्वत:वर हसणे फार मजेशीर असते. पण मला या गोष्टींचा त्रास होतो. अनेक ट्रोलर्स हे सातत्याने अभिषेकला ट्रोल करत असतात. पण हे त्रासदायक असते. यामुळे माझे रक्त सळसळते. जेव्हा त्याला ट्रोल केले जाते, तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही.
मी माझे वडील अमिताभ बच्चन यांच्यासाठी मला या गोष्टी सहसा काही वाटत नाही. पण अभिषेकसाठी मात्र सातत्याने ते वाटते. कारण त्याची तुलना अशा अतुलनीय गोष्टींशी केली जाते. तो त्यांच्याप्रमाणेच असेल अशी अपेक्षा तुम्ही कशी काय करु शकता? त्यांचे संपूर्ण आयुष्य तसेच असू शकत नाही. समजा जर तुम्ही १० पैकी ८ गुण मिळवलात तर तुम्ही अरेरेरे असे म्हणता. कारण त्याच्या वडिलांनी त्यात १० गुण मिळवलेले असतात. पण त्याने त्यात ८ गुण मिळवले आहेत, याचे काहीही कौतुक तुम्ही करत नाही.
“तुम्ही एखाद्याचे कर्तृत्व पूर्णपणे टाळता. त्यांच्या कुटुंबातील कोणी काही चांगले केले तरीही तुम्हाला त्यात काही तरी कमतरता जाणवते. त्यामुळे मला ते फार निकृष्ट वाटते. गेल्या २० वर्षांपासून या गोष्टी सुरु आहेत”, असे श्वेता बच्चन म्हणाली.
आणखी वाचा : “तिला गुदमरल्यासारखे…” जया बच्चन यांच्या स्वभावावर श्वेता- अभिषेकचे स्पष्ट उत्तर
दरम्यान अभिषेक बच्चने २००० मध्ये ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. काही महिन्यांपूर्वी त्याचा दसवी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता लवकरच तो अॅमेझॉनवरील ‘ब्रीद: इनटू द शॅडो’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.