अभिताभ आणि जया बच्चन यांची मोठी मुलगी श्वेता प्रकाशझोतापासून लांब राहणे पसंत करते. उद्योगपती निखिल नंदा हे तिचे पती आहेत. तिच्या मुलीचे नाव नव्या नवेली नंदा असे आहे. नव्या नंदाने नुकतेच एक पॉडकास्ट चॅनल सुरु केले आहे. ‘व्हॉट द हेल नव्या’ असे या पॉडकास्ट चॅनलचे नाव आहे. या चॅनलच्या पहिल्या भागामध्ये तिच्या आईने आणि आजीने म्हणजेच श्वेता नंदा आणि जया बच्चन यांनी हजेरी लावली होती.

नव्याच्या या पॉडकास्ट चॅनलवर श्वेता नंदाने अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. तिने ‘मी तिचा (जया बच्चन) खूप मार खाल्ला आहे’ असे म्हणत बालपणीचा एक किस्सा सांगितला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, श्वेता म्हणाली, “मी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टी कराव्यात असे तिचे मत होते. तिने मला जबरदस्ती करुन भरतनाट्यम शिकायला लावले. मी हिंदी शास्त्रीय संगीतासह सितार आणि पियानो वाजवायला शिकले” त्यानंतर ती जया यांच्या एका वाईट सवयीचा उल्लेख करत म्हणाली, “ती मला बरेचदा थप्पड मारायची. लहाणपणी मला तिने खूप मारले आहे. एकदा मला मारत असताना तिच्या हातातली पट्टी तुटली होती”

आणखी वाचा – “हिच्यासारखे अनेकजण…” हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडचं ट्रोलरला सडेतोड उत्तर, पोस्ट चर्चेत

होणाऱ्या आरोपांचे खंडन करत लगेच जया बच्चन म्हणाल्या, “पण अभिषेकला क्वचितच मार मिळायला. माझ्या मते, पहिल्या अपत्याला जास्त मार पडतो” त्यानंतर नव्याने त्यांना ‘तु आईला (श्वेता) इतका मार का द्यायचीस?’ असे विचारले. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देत त्या म्हणाल्या ‘ती फार त्रास द्यायची. लहानपणी ती फार हट्टी होती’ पुढे त्यांनी या सवयीमागील कारण स्पष्ट करत “जेव्हा पालकांना परिस्थिती नीट सांभाळता येत नाही, तेव्हा ते संपूर्ण राग या पद्धतीने मुलांवर काढतात” असे म्हटले.

आणखी वाचा – Video: “मूठभर मास अंगावर चढलं…”, उत्कर्ष शिंदेला आलेल्या अनुभवाने वेधले लक्ष, पोस्ट व्हायरल

पुढे श्वेताने संभाषण सुरु ठेवत “आईने मला खूपदा मारले आहे. पण मला त्यांनी (अभिताभ) कधीही मारलं नाही. जर मी मस्ती केली, तर ते मला जास्तीत जास्त एका कोपऱ्यात शांत उभी राहा अशी शिक्षा करायचे. शिक्षा झाल्यावर मी कोपऱ्यात एकटीच स्वत:शी गप्पा मारत बसायचे” हे सांगितले.

Story img Loader