Shweta Tiwari Talk About Palak Tiwari Relationship : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हे दोघं नेहमी एकत्र दिसतात. कधी चित्रपट पाहण्यासाठी एकत्र जातात तर कधी एखाद्या पार्टीसाठी दोघं एकत्र पाहायला मिळतात. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून इब्राहिम अली खान व पलक तिवारीच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरू आहेत. अशातच लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्री श्वेता तिवारीने मौन सोडलं आहे.

हिंदी मालिका व सिनेविश्वातील श्वेता तिवारी ( Shweta Tiwari ) प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट मालिका केल्या आहेत. तसंच तिने बऱ्याच भोजपुरी चित्रपटातही काम केलं आहे. श्वेताप्रमाणे तिची लेक पलकने देखील इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण गेल्या कित्येक महिन्यांपासून पलक व इब्राहिम अली खानच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. यावर अखेर श्वेताने भाष्य केलं आहे.

Mrunmayee deshpande
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा महिन्याचा खर्च माहितीये का? म्हणाली, “गेल्या पाच वर्षात…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
anil kapoor
अभिनेत्रीचा ‘सलाम-ए-इश्क’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्याबरोबरच्या किसिंग सीनबाबत खुलासा; म्हणाली, “मला रडावे…”
Lavani is more popular in folk art says Tara Bhavalkar
लावणी लोककलेत अधिक लोकप्रिय – तारा भवाळकर
lakshmi niwas jayant real face reveal
आधी झुरळ खाल्लं, आता घडणार ‘असं’ काही…; जान्हवीसमोर येतंय जयंतचं वेगळंच रुप! नेटकरी म्हणाले, “हिंदी मालिकेची कॉपी…”
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
Farah Khan
“शाहरुख कुठे उभा राहील?” शिल्पा शिरोडकरच्या वजनावर फराह खानने केलेली कमेंट; अभिनेत्री म्हणाली…
zee marathi paaru serial purva shinde aka disha re enters in the show
‘ती’ पुन्हा आली! ‘पारू’ मालिकेत जुन्या खलनायिकेची रिएन्ट्री, लग्नमंडपात येणार अन्…; पाहा जबरदस्त प्रोमो

हेही वाचा – “मला बिग बॉसच्या घरात…”, पहिल्याच आठवड्यात बेघर झालेले पुरुषोत्तमदादा पाटील यांची भावुक पोस्ट, म्हणाले…

‘गलाट्टा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्वेता ( Shweta Tiwari ) म्हणाली, “पलक आता स्ट्राँग आहे. पण येणाऱ्या काळात कोणतीही कमेंट्स किंवा बातम्या तिच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचवू शकतात. ती अजून लहान आहे. कधी-कधी गोष्टी इतक्या खालच्या पातळी जातात. जसे की तिचे प्रत्येक मुलाशी अफेअर आहे वगैरे. मला नाही माहिती की, ती या गोष्टी कधीपर्यंत सहन करेल. ती डेटिंगच्या अफवांमुळे खूप हैराण होते. अनेकदा ती या गोष्टी चेष्टेत घेते पण अशावेळी या गोष्टी तिला त्रास देऊ शकतात.”

हेही वाचा – तेव्हा रमेश देव यांनी सोडली सिगारेट, अजिंक्य देव प्रसंग सांगत म्हणाले, “एकेकाळी बाबा चेन स्मोकर होते…”

दरम्यान, पलक तिवारीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती गेल्या वर्षी २०२३, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण पलकचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र या चित्रपटातील तिचा अभिनय अनेकांच्या चांगलाच पसंतीस पडला. इब्राहिमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो करण जोहरला असिस्ट करत आहे. लवकरच इब्राहिम खुशी कपूरबरोबर मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे, अशी काही दिवसांपूर्वी बातमी आली होती.

Story img Loader