कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सिद्धांतने भूत पकडणाऱ्या एका मॉडर्न तांत्रिकाचे पात्र साकारले आहे. अशा प्रकारची भूमिका त्याने पहिल्यांदा केली आहे. हॉरर कॉमेडी शैलीतल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केले आहे. सध्या ‘फोन भूत’ची संपूर्ण टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये व्यग्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धांत चतुर्वेदी सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तो चाहत्यांना या माध्यमाद्वारे त्याच्या आयुष्यातील अपडेट्स देत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने नव्वदच्या दशकामध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘शक्तिमान’ या भारतीय सुपरहिरोचा वेश केला आहे. सूट-कोट, चष्मा, हातामध्ये सूटकेस बॅग अशा गंगाधरच्या अवतारामध्ये तो कॅमेऱ्यासमोर येतो. काही सेकंदानंतर तो हातामध्ये असलेली बॅग आणि डोळ्यावरील चष्मा फेकून हात वर करुन पोझ देतो आणि त्यानंतर लगेच तो शक्तिमानच्या कपड्यांमध्ये दिसतो.

आणखी वाचा – “आम्ही वाटलेली तिकीटं दारूसाठी…” ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टीने सांगितली स्ट्रगलच्या काळातील ‘ती’ आठवण

या ट्रान्सफॉरमेशननंतर त्याच्या चित्रीकरणामधले काही सीन्स पाहायला मिळतात. तेव्हा तो बघू नकोस, ‘पॅन्ट फाटली आहे’, असं म्हणत हातामधली फाटलेली पॅन्ट दाखवतो. पुढे कॅमेरा जवळ येत असल्याचे लक्षात आल्याने तो “तू बीटीएस काय घेत आहेस शक्तिमानची पॅन्ट फाटली, त्यामुळे मला मध्येच गंगाधर बनावं लागतं आहे”, असे म्हणतो. ‘सॉरी शक्तिमान’ असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा – ‘पठाण’च्या टीझरसाठी चाहते उत्सुक; दीपिका आणि शाहरुखचे नवे फोटो व्हायरल

त्याने हा व्हिडीओ ‘फोन भूत’च्या प्रमोशनसाठी केला असल्याचा अंदाज लावला जात आहे. सिद्धांतसह या चित्रपटामधील अन्य दोन प्रमुख कलाकारांनीही सुपरहिरो गेटअप केल्याचे पाहायला मिळत आहे. कतरिनाने ‘सुसाइड स्क्वॉड’ (Suicide Squad)मधील ‘हार्ली क्विन’चा, तर ईशान खट्टरने ‘चार्ली अ‍ॅण्ड चॉकलेट फॅक्टरी’ (Charlie and the Chocolate Factory) चित्रपटातील विली वोंका या पात्राचा वेष साकारला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhant chaturvedi dressed up as shaktiman while promoting phone bhoot yps