बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने ‘गली बॉय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘गेहरायिया’, ‘बंटी और बबली २’ चित्रपटानंतर आता तो ‘फोन भूत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री कतरिना कैफसह स्क्रीन शेअर करताना दिसणार असून सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यग्र आहे.
सिद्धांत चतुर्वेदी याचं नाव बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासह जोडलं जातं. नव्या आणि सिद्धांत डेट करत असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. याबाबत दोघांनाही विचारलं असता, अनेकदा त्यांनी यावर भाष्य करणं टाळल्याचं दिसलं. आता मात्र खुद्द सिद्धांतनेच नव्याबरोबरच्या नात्याबद्दल एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.
हेही वाचा >> सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीची लगीनघाई? लग्नासाठी वेन्यू शोधत असल्याच्या चर्चांना उधाण
‘गुडटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांतने नव्याबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तो म्हणाला, “मी कोणाला तरी डेट करत आहे, अशा चर्चा सुरू आहेत. पण हे सत्य नाही”. यावरुन सिद्धातं कोणालाही डेट करत नाहीये, असं दिसतंय. परंतु, नव्या आणि सिद्धांत खरंच एकमेकांना डेट करत आहेत की नाही, याबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी मनीष म्हलोत्राच्या दिवाळी पार्टीत हे दोघे एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.
हेही वाचा >> “…म्हणून स्वीकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका”, अक्षय कुमारने सांगितलं राज ठाकरे कनेक्शन
सिद्धांतचा आगामी ‘फोन भूत’ चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. कतरिना कैफसह सिद्धांत आणि इशान खट्टर चित्रपटात महतत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.