Siddhant Chaturvedi Deepika Padukone in Gehraiyaan: ‘गली बॉय’ चित्रपटात रणवीर सिंह (Ranveer Singh) व आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्याबरोबर महत्त्वाची भूमिका साकारून सिद्धांत चतुर्वेदीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो ‘गेहराइयां’ चित्रपटात झळकला. यात त्याने दीपिका पादुकोणसोबत (Deepika Padukone) इंटिमेट सीन केले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती. इंटिमेट सीनमुळे आपण हा चित्रपट सोडण्याचा तयारीत होतो, अशी आठवण सिद्धांतने सांगितली आहे.
दीपिकासोबत इंटिमेट सीन शूट करताना घाबरलो होतो, असं सिद्धांतने सांगितलं. सिद्धांतची अवस्था इतकी वाईट झाली होती की त्याचे वडील व निर्माता करण जोहर या दोघांनाही हस्तक्षेप करावा लागला होता. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सिद्धांत म्हणाला, “मला आठवतंय माझे वडील माझ्याशी बोलले होते. ते म्हणालेले ‘ऐक, भारतातील ९९ टक्के लोक ही संधी मिळवण्यासाठी काहीही करतील. ते क्षणभरही विचार करणार नाहीत. त्यामुळे तू काय विचार करतोय. जरा प्रोफेशनल हो, कारण हे तुझं काम आहे.”
“त्याने पँटची चैन उघडली अन्…”, मदत मागितल्यावर कारमध्ये बॉलीवूड अभिनेत्रीला आला भयंकर अनुभव
सिद्धांतच्या वडिलांनी केला होता हस्तक्षेप
इतंकच नाही तर सिद्धांतच्या वडिलांनी त्याला किती मोठी संधी मिळाली आहे याची आठवणही करून दिली होती. “सिद्धांत, हे धर्मा प्रॉडक्शन आहे, दीपिका पादुकोण, शकुन बत्रा आहेत. त्यामुळे तुला हे करावंच लागेल,” असं त्याचे वडील म्हणाले होते. यानंतर करण जोहरने यात हस्तक्षेप केला आणि सिद्धांतला समजावलं. “करणने मला कॉल केला आणि म्हणाला, ‘काय प्रॉब्लेम आहे?’ आणि मी त्याला सर्व काही सांगितलं. मग तो म्हणाला, ‘तू एक अभिनेता आहेस आणि तसाच वाग, कारण हे तुझं काम आहे,” अशी आठवण सिद्धांतने सांगितली.
![Siddhant Chaturvedi intimate scenes withDeepika Padukone](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/Siddhant-Chaturvedi-intimate-scenes-withDeepika-Padukone.jpg?w=830)
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
सिद्धांतच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया
त्याच मुलाखतीत सिद्धांतने चित्रपटाच्या रिलीजनंतर वडिलांची प्रतिक्रिया काय होती ते सांगितलं. “मी माझ्या आई-वडिलांबरोबर चित्रपट पाहायला गेलो पण मी त्यांच्या शेजारी बसलो नाही. मी एका कोपऱ्यात मान खाली घालून बघत होतो. चित्रपट पाहिल्यानंतर मी त्यांना विचारलं, ‘कसा होता?’, आणि बाबा म्हणाले, ‘तुझा अभिनय छान होता, पण इंटिमेट सीन्स जरा जास्तच होते’. मी म्हटलं की ‘दिग्दर्शकाला जे हवं होतं तेच मी केलं.’ पण, त्यांना चित्रपट आवडला होता,” असं सिद्धांत म्हणाला.
![Siddhant Chaturvedi Deepika Padukone intimate scenes](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/Siddhant-Chaturvedi-Deepika-Padukone-intimate-scenes.jpg?w=830)
सिद्धांतच्या नातेवाईकांनीही या चित्रपटाबद्दल रंजक प्रतिक्रिया दिल्या होत्या. “माझे नातेवाईक आश्चर्यचकित झाले होते. तो अभिनेता झालाय पण आमची स्वप्ने जगतोय, असं काही जण म्हणत होते. माझे मामा तर इतके लाजत होते की ते काहीच न बोलता फक्त माझ्याकडे पाहून हसत होते. ते फक्त माझे सिनेमातील इंटिमेट सीन आठवून हसत होते,” असं सिद्धांत म्हणाला.
“मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव
सिद्धांत खूप लाजत होता त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना इंटिमसी वर्कशॉप एका महिन्यासाठी वाढवावे लागले. “मला फक्त एका सुंदर स्त्रीबरोबर एका विचित्र परिस्थितीत टाकण्यात आलं नव्हतं तर ती महिला दीपिका पादुकोण होती. ती माझा मित्र रणवीर सिंहची पत्नीही आहे,” असं सिद्धांत म्हणाला होता. इंटिमसी डायरेक्टरच्या मदतीने हे सीन केले होते, असंही त्याने सांगितलं.