२०२३ हे वर्ष हिंदी सिनेसृष्टीसाठी खूप खास राहिलं. करोनानंतर पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू झाली होती, मात्र प्रेक्षक चित्रपट पाहायला ओटीटी प्लॅटफॉर्म्सला पसंती देत होते. परिणामी अनेक चित्रपट थिएटर्समध्ये फ्लॉप झाले. पण २०२३ मध्ये प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये आले आणि त्यांनी काही चित्रपटांना भरभरून प्रेम दिलं. पण काही बिग बजेट चित्रपट कथानक, व्हीएफएक्सचा अभाव, संवाद यामुळे फ्लॉप झाले. २०२३ या वर्षात एका अभिनेत्याने एक ब्लॉकबस्टर आणि एक सुपरफ्लॉप चित्रपट दिला. हा अभिनेता म्हणजे सिद्धांत कर्णिक होय.

सिद्धांत कर्णिकने प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘आदिपुरुष’मध्ये विभीषणाची भूमिका साकारली होती. चित्रपटाला खराब व्हीएफ्स, वादग्रस्त संवाद, वेशभुषा यांमुळे प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. अदाजे ६०० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात फक्त ३९३ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरला.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Nagpur Swapnils Bits Gang emerges as otorious gangs vanish from the city
शहरातील गुन्हेगारी क्षेत्रात ‘बिट्स गँग’चा उदय, सत्ताधारी नेत्याच्या छत्रछायेत स्वप्निलचे दुष्कृत्य
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Pushpa 2 Box Office Collection Day 3
Pushpa 2 : ‘पुष्पा’ने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी! शाहरुखच्या ‘जवान’ला टाकलं मागे, आतापर्यंतची कमाई किती?

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

‘अॅनिमल’मध्ये सिद्धांतने वरुण प्रताप मल्होत्रा नावाची रणबीर कपूरच्या भाऊजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटावर पुरुषत्वाचा गौरव केल्याने काहींनी टीका केली, तर काहींनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं. हा चित्रपट २०२३ मधील एक ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने जगभरात ९१५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचं बजेट १०० कोटी होतं.

सिद्धांतने २००४ मध्ये टीव्ही शो रीमिक्समधून अभिनयात पदार्पण केलं होतं. त्याने ‘माही वे’, ‘रिश्ता डॉट कॉम’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘ये है आशिकी’ आणि ‘गुस्ताख दिल’ यांसारख्या अनेक मालिका केल्या. २०१५ मध्ये ‘एक था राजा एक थी रानी’ या मालिकेत त्याने राणा इंद्रवधन सिंग देवची प्रमुख भूमिका केली होती. याशिवाय सिद्धांत ‘ये मेरा इंडिया’, ‘लफंगे परिंदे’, ‘लिसन अमाया’, ‘थप्पड’, ‘ह्युमन’, ‘मॉडर्न लव्ह: मुंबई’, आणि ‘मेड इन हेवन २’ या चित्रपट व वेब सीरिजमध्ये झळकला.

“मी घरी जातोय”, मुलीबरोबर ‘असा’ सीन देण्यास सांगितल्यावर सचिन तेंडुलकरने शूटिंगसाठी दिलेला नकार; नेमकं काय घडलं होतं?

सिद्धांत कर्णिकला प्रवासाची खूप आवड आहे, त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर अनेक व्लॉग शेअर केले आहेत. तो बाइकवरून भारतातील अनेक भागात फिरतो आणि तिथले अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करतो. त्याने २०१६ मध्ये अभिनेत्री मेघा गुप्ताशी लग्न केलं होतं. पण लग्नाच्या तीन वर्षानंतर ते वेगळे राहू लागले आणि २०२० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Story img Loader