अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड आतुर आहेत. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरीलही काही फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. तसंच शाहरुख खानने त्याच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठं रिटर्न गिफ्ट दिलं. या दिवशी किंग खानच्या ‘पठाण’ चा टीझर प्रदर्शित झाला. शाहरुखप्रमाणेच या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या जॉन अब्राहमनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता जॉनच्या निवडीबद्दल या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या चित्रपटाच्या पोस्टरपासून जॉनला या चित्रपटात पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले होते. पण काहींनी जॉनच्या निवडीवर असहमती दर्शवली होती. पण आता त्या भूमिकेसाठी जॉनच कसा योग्य आहे, हे या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : “तो मला रक्ताने…”; रवीना टंडनचा ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी जॉनबद्दल बोलताना ते म्हणाले, “‘पठाण’ चित्रपटातील हा खलनायक त्यांत कठोर, निर्दयी आणि शत्रूचा जीव घेऊ इच्छिणारा आहे. जॉन ही भूमिका पूर्ण ताकदीनिशी करू शकतो आणि या भूमिकेला न्याय देऊ शकतो याची मला खात्री होती. जेव्हा जॉनने ही भूमिका करण्यासाठी होकार दिला तेव्हा मी खूप खुश झालो. ‘पठाण’ला उत्कृष्ट बनवण्यासाठी आम्हाला त्याच्या तोडीस तोड खलनायक हवा होता.”

पुढे ते म्हणाले, “जॉनला डोक्यात ठेवूनच ‘पठाण’मधील खलनायक उभा केला. तोच या भूमिकेसाठी माझी पहिली पसंती होता. आम्हाला ही भूमिका जिवंत करणारा खलनायक हवा होता आणि जॉनच्या रूपाने आम्हाला तो मिळाला. स्क्रीनवर शाहरुखच्या विरुद्ध जॉन शोभून दिसतो. त्याचा लूकही त्याच दृष्टीने डिझाइन करण्यात आला आहे.”

हेही वाचा : शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कारण

दरम्यान या चित्रपटात शाहरुख आणि जॉनबरोबर दीपिका पदुकोणही प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे.