सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं. या चित्रपटाने तब्बल ६०० कोटींहून अधिक कमाई केली. या सुपरहीट चित्रपटानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हृतिक रोशन आणि दीपिका पदूकोणचा ‘फायटर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले अन् या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. आता सिद्धार्थ आनंद एका लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा सीक्वल करणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एस. शंकर यांचा ‘नायक’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूरने रिपोर्टरची भूमिका केली होती. शिवाजी राव हे त्यांचे नाव. शिवाजी मुख्यमंत्र्यांना खडतर प्रश्न विचारतो आणि त्या बदल्यात त्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. पुढे तो एका दिवसात संपूर्ण व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतो. आता तब्बल २३ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

आणखी वाचा : जपानमध्ये भूकंपाच्या धक्क्यातून ‘असे’ बचावले एसएस राजामौली; दिग्दर्शकाच्या मुलाने सांगितला किस्सा

पिंकविलामध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद ‘नायक २’ लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. या माहितीनुसार सिद्धार्थ आणि ममता आनंद त्यांच्या Marflix Pictures या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा होणार आहे. मूळ चित्रपटाप्रमाणेच हा देखील मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक मनोरंजन करणारा असेल जो राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बनवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. प्रसिद्ध दिग्दर्शक मिलन लुथरिया या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

तर या चित्रपटाचं लेखन रजत अरोरा करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘नायक’मध्ये अनिल कपूर, राणी मुखर्जी आणि अमरीश पुरी महत्त्वाच्या भूमिकेत होते. सिद्धार्थ आनंद मात्र सिक्वेलसाठी नवीन कलाकार घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. कास्टिंगचे काम अजूनही सुरू आहे. गेल्या जानेवारीत रिलीज झालेला ‘फाइटर’ हा सिद्धार्थ आनंदच्या प्रोडक्शन बॅनरचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे. बरं, यानंतर सिद्धार्थ आनंद हे जयदीप अहलावत आणि सैफ अली खानसह ‘ज्वेल थीफ’ नावाचा चित्रपट करणार आहेत तसंच ते शाहरुख आणि सुहानाच्या ‘किंग’ चित्रपटाची निर्मितीही करत आहे.