सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. गेले अनेक महिने ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर ७ फेब्रुवती रोजी ही दोघं विवाहबद्ध झाली. सिद्धार्थ आणि कियाराचं लग्न झाल्यानंतर सर्वांना बराच वेळ त्यांच्या लग्नाच्या फोटोंची वाट पहावी लागली. अखेर ७ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या लग्नाचे फोटो आउट झाले. आता दोन दिवसातच सिद्धार्थ-कियाराने नवा विक्रम बनवला आहे.

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. ५,६ आणि ७ फेब्रुवारी यांचा लग्नसोहळा रंगला. ५ फेब्रुवारी रोजी मेहंदी, ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी संगीत समारंभ संपन्न झाले. तर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी यांचा हळदी समारंभ रंगला आणि अखेर त्या दिवशी दुपारी हे दोघं बोहल्यावर चढले. लग्नाच्या वेळी कियाराने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला होता. तर सिद्धार्थने सोनेरी रंगाची डिझाईनार शेरवानी परिधान केली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक होते. अखेर रात्री उशिरा यांच्या लग्नाचे फोटो आउट झाले आणि त्यांनी विक्रम रचला.

Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Naga Sadhus in Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?
Shiv sena Sanjay Shirsat
Santosh Deshmukh Case : शिंदेंच्या शिवसेनेने घेतलं संतोष देशमुखांच्या कुटुंबाचं पालकत्व; संजय शिरसाटांनी दिली मोठी माहिती
Somnath Suryawanshi Mother
Somnath Suryawanshi Mother : राहुल गांधींच्या भेटीनंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा साश्रू नयनांनी दावा, “माझ्या मुलाला मारहाण करुन त्याचे…”
Who is PV Sindhu Husband Venkat Datta Sai Education IPL Delhi Capitals Wedding
PV Sindhu Wedding: कोण आहे पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई? आयटी व्यावसायिक ते ‘या’ IPL संघाशी आहे कनेक्शन
pv sindhu wedding first picture Indian Badminton Star Tied Knot with Venkat Datta Sai
PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधूने बांधली लग्नगाठ, विवाह सोहळ्यातील पहिला फोटो आला समोर
Image of PM Modi with Abdullateef Alnesef and Abdullah Baron.
PM Modi Kuwait Visit : पंतप्रधान मोदी यांनी कुवेतमध्ये घेतली महाभारत आणि रामायणाचे अरबीमध्ये भाषांतर करणाऱ्यांची भेट

आणखी वाचा : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीला रद्द करावा लागला हनिमून, ‘हे’ आहे कारण

त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होतात त्यांच्या चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे फोटो शेअर करत त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. हे फोटो खूप व्हायरल झाले. आता त्यांच्या फोटोला केवळ दोन दिवसांत १३.५९ मिलियनहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. आतापर्यंत हा रेकॉर्ड रणबीर-आलियाच्या नावे होता. त्यांच्या लग्नाच्या फोटो ना १३.१९ दशलक्ष लाईक्स मिळाले होते. आता तो रेकॉर्ड सिद्धार्थ आणि कियारा च्या लग्नाच्या फोटोंनी मोडला आहे.

हेही वाचा : एक्स गर्लफ्रेंडने दिलेल्या शुभेच्छांवर सिद्धार्थ मल्होत्राने दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आलिया…”

दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी या पॅलेसमध्ये ८० खोल्या बूक करण्यात आल्या होत्या. या लग्नाला १०० टे १५० पाहुण्यांनाच निमंत्रण देण्यात आलं होतं. सिद्धार्थ आणि कियाराचे नातेवाईक, मित्र मंडळींबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.

Story img Loader