कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा रंगला. लग्नानंतर त्यांनी आता नवीन घर घेतलं आहे. गेले अनेक दिवस सिद्धार्थ नवीन घराच्या शोधात होता. आता त्यांनी त्यांचे ड्रीम होम खरेदी केलं आहे.

७ तारखेला विवाह सोहळा रंगला नंतर ही सगळी मंडळी दिल्लीला सिद्धार्थच्या घरी आली. तिथे कियाराचा गृहप्रवेश झाला. तर तिथे त्यांनी एक रिसेप्शनही ठेवलं होतं. तो सगळा कार्यक्रम उरकून आता ते मुंबईत आले आहेत. काल मुंबईत त्यांच्या लग्नाचा रिसेप्शन झालं. त्यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच आता त्यांनी घेतलेल्या नवीन घराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत.

Sachin | M| Maharashtra Sadan free for literary conference Nagpur news aharashtra Sadan free for literary conference Nagpur news साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत (लोकसत्ता टीम)Tendulkar and Raj Thackeray
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मोफत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
viraj bahl Success Story
Success Story: “याला म्हणतात जिद्द…” कंपनी विकली, घर विकलं.. अन् मेहनतीच्या जोरावर उभा केला करोडोंचा व्यवसाय
Shelu and Wangani housing project opposed by mill worker
वांगणीतील घरे नापसंत, प्रकल्प रद्द करण्याची गिरणी कामगारांच्या संघटनांची मागणी, तर शेलूतील घरांच्या किमती सहा लाख करा, मुख्यमंत्र्यांना पत्र
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
High Court comments that Solapur Municipal Corporation action in land acquisition is illegal Mumbai news
अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करताच ३७ वर्षांनंतरही जमिनीचा ताबा स्वत:कडेच; म्हाडा, सोलापूर महापालिकेची कृती बेकायदा असल्याची उच्च न्यायालयाचे टिप्पणी
housing business Rising prices the election
वाढत्या किमती अन् निवडणुकांमुळे घरांच्या बाजारपेठेला घरघर

आणखी वाचा : …अन् कियारा अडवाणीने त्यांच्या लग्नासाठी ‘रांझा’ गाणं नव्याने लिहायला लावलं, जाणून घ्या लग्नाच्या व्हिडीओमागील रंजक गोष्ट

सिद्धार्थ कियारा यांनी मुंबईत पाली हिल येथे एक आलिशान घर घेतलं आहे. गेले अनेक महिने सिद्धार्थ नवीन घराच्या शोधात होता. बांद्रे येथे त्याच्या असलेल्या घराप्रमाणेच त्याला त्याचं नवीन घरही सी फेसिंग हवं होतं. तर आता त्यांनी त्यांच्या स्वप्नातलं घर गेल्याच आठवड्यात विकत घेतलं आहे. त्यांचं हे नवीन घर ३५०० स्क्वेअर फुट असून त्याची किंमत ७० कोटी आहे. 

हेही वाचा : रिसेप्शन सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा आकाश व श्लोका अंबानीच्या नम्रपणाची, व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

सध्या सिद्धार्थ कियारा त्यांच्या बांद्रा येथे असलेल्या घरी राहत आहेत. तर लवकरच ते त्यांच्या नवीन घरात गृहप्रवेश करतील. सध्या या घराच्या इंटिरियरचं काम सुरू असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता लग्न बरोबरच नवीन घर घेतल्याबद्दलही त्यांच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करू लागले आहेत.

Story img Loader