बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाह बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांची लगीन घटिका समीप आली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक आहेत. आता अशातच त्यांच्या विवाह स्थळाचे इन्साईड व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले. आजपासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. आता त्यांच्या लग्नाची तयारी कशी सुरु आहे हे दाखवणारे काही व्हिडीओ आउट झाले आहेत.

आणखी वाचा : ६ फेब्रुवारी नाही तर ‘या’ दिवशी सिद्धार्थ-कियारा बोहल्यावर चढणार, लग्नाबाबत समोर आली मोठी अपडेट

सिद्धार्थ आणि किवाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राजस्थानी नृत्याचा आनंद घेता यावा यासाठी राजस्थानी नृत्य करणारे नर्तकही बोलवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे यांच्या संगीत सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. यासाठी गुलाबी रंगाची थीम ठरवण्यात आली असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. संगीत कार्यक्रमासाठी गुलाबी रंगाच्या कापडाने सगळीकडे डेकोरेशन केलं जाईल. त्याचप्रमाणे मोठी मोठी झुंबरही लावण्यात येणार आहेत.

हेही वाचा : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीला रद्द करावा लागला हनिमून, ‘हे’ आहे कारण

सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स नाही आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, वरुण धवन यांबरोबरच अनेक आघाडीचे कलाकार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावतील.

Story img Loader