बॉलिवूडमधील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा विवाह बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहेत. गेले अनेक महिने ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्यांची लगीन घाटिका समीप आली आहे. आज ते विवाह बंधनात अडकणार आहेत. लग्नानंतर हे जोडपं कुठे राहणार याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न होत आहे. यांच्या लग्नाची मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला आहे. तर आज सकाळी यांची हळद होईल. त्यानंतर आज संध्याकाळी ही दोघं बोहल्यावर चढणार आहेत. लग्नानंतर ही दोघं त्यांच्या ड्रीम होममध्ये राहणार आहेत. त्यासाठी सिद्धार्थ गेले काही महिने घराच्या शोधात असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : सिद्धार्थ-कियाराच्या शाही विवाह सोहळ्याचा थाटच भारी; सूर्यगढ पॅलेसमधील खोलीचं एका दिवसाचं भाडं तब्बल…

लग्नानंतर सिद्धार्थ आणि कियारा कुटुंबीयांपासून वेगळे राहणार आहेत. रिपोर्टनुसार ही दोघं जुहू येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहणार आहेत. लग्नानंतर ही दोघं तात्पुरती सिद्धार्थच्या बांद्रा येथे असलेल्या घरी राहतील. तर सध्या तो जुहू येथे नवीन घर बघत आहे. त्याला जुहूमधील एक बंगला आवडला असल्याचंही समोर आला आहे. हा बंगला ३५०० स्क्वेअर फुट असून त्याची किंमत ७० कोटी आहे. त्याला त्याच्या आताच्या घरासारखंच दुसरं घरही सी फेसिंग हवं आहे. त्यामुळे कियारा आणि सिद्धार्थ जुहू येथील घराला पसंती देण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : “‘द कपिल शर्मा शो म्हणजे…” प्रसिद्ध निर्मात्याची कार्यक्रमावर टीका, शाहरुख खानच्या नावाचाही उल्लेख

दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना राजस्थानी नृत्याचा आस्वाद घेता यावा यासाठी राजस्थान नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddharth malhotra and kiara advani will buy new home in mumbai rnv