सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगन, रकुल प्रीत सिंह आणि नोरा फतेही यांचा ‘थँक गॉड’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा नवा ट्रेलर यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला. सध्या या चित्रपटाची टीम प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये व्यग्र आहे. कथानकामुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमाचे दहावा पर्व सुरु झाले. पाच वर्षांनंतर हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या कार्यक्रमामध्ये करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही परिक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत. दरम्यान ‘झलक दिखला जा’च्या नव्या भागाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. सिद्धार्थ मल्होत्राने ‘थँक गॉड’चे प्रमोशन करण्यासाठी या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.

आणखी वाचा – Video: शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण होतोय तुफान Viral, कॅमेरा बघताच दोघांनी…

प्रोमो व्हिडीओमध्ये करण जोहर सिद्धार्थसह गप्पा मारताना, त्यांची मस्करी करताना दिसत आहे. करणने त्याला ‘तू मनाने सुद्धा शेरशहा आहेस की नाही असा प्रश्न देशभरातल्या चाहत्यांना पडला आहे’ असे विधान केले. त्यावर सिद्धार्थने ‘हा प्रश्न तुम्ही प्रेक्षकांनाच विचारायला हवा’ असे उत्तर दिले. करण जोहर म्हणाला, “जर हेडलाईनमध्ये ‘रब ने बना दी जोडी’ असे लिहिलं असेल, तर त्यामध्ये तुझ्या नावासह कोणाचे नाव असायला हवं असं तुला वाटतं??” पुढे त्याने कियारा अडवानीचे नाव घेतले. किरायाच्या नावाचा उल्लेख झाल्यावर सिद्धार्थ नकळत लाजायला लागला.

आणखी वाचा – Bigg Boss 16: साजिद खानवर होणाऱ्या आरोपांमुळे ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, सलमाननेही दर्शवली सहमती

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसली होती. तेव्हापासून त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. ते एकमेकांना डेट करत आहेत असे म्हटले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये लग्न करणार आहेत.

Story img Loader