अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या आगमी प्रोजेक्ट्सची यादी मोठी आहे. तो सध्या ओटीटीवर रोहित शेट्टीसोबत ‘इंडियन पोलिस फोर्स’ नावाची वेब सीरिज करत आहे. तसेच धर्मा प्रॉडक्शनसाठी करण जोहरच्या ‘योधा’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे आणि रश्मिका मंदानाबरोबरचा त्याचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. तर या दिवाळीत तो अजय देवगणसोबत दिग्दर्शक इंद्र कुमारच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटात दिसणार आहे. पण आता त्याने फ्लॉप झालेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांबद्दल एक महत्वाचे भाष्य केले आहे.

आणखी वाचा : अभिनेते मनोज जोशी ‘एअर इंडिया’वर संतापले; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला राग, नेमकं घडलं काय?

Shyam Benegal passed away
श्याम बेनेगल यांचं निधन, समांतर सिनेमा जगणारा सच्चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
It is impossible to put people with different views into one mold says actress Nivedita Saraf
भिन्न विचारांच्या व्यक्तींना एका साच्यात बांधणे अशक्य; अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे मत
Vanvaas 1 Days Box Office Collection
‘वनवास’ची निराशाजनक सुरुवात, नाना पाटेकरांच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख
swapnil joshi announces first gujarati film
स्वप्नील जोशीने दिली आनंदाची बातमी! पहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीसह करणार काम
Kangana Ranaut reacted to the Kapoor family's meeting with Prime Minister Narendra Modi
“फिल्म इंडस्ट्री पूर्णपणे अनाथ झाली आहे”, पंतप्रधान मोदी आणि कपूर कुटुंबाच्या भेटीवर कंगना रणौत यांचं वक्तव्य, म्हणाल्या…
Navri Mile Hitlarla
… अन् यश किडनॅप झाला; ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अभिनेत्याने शेअर केले शूटिंगचे फोटो
100 Years of Raj Kapoor
100 Years of Raj Kapoor : राज कपूर यांच्या अभिनय शैलीवर चार्ली चॅप्लिनचा प्रभाव का होता? ‘आवारा’चा गाजलेला किस्सा काय?

त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये त्याचे काही चित्रपट हिट झाले, तर काही फ्लॉप. यासागल्याबद्दल त्याने नुकतीच ‘अमर उजाला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याच्या अयशस्वी चित्रपटांबद्दल आणि त्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांबद्दल त्याला विचारले गेले. त्या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, “मला वाटते की, कलाकार म्हणून या दिग्दर्शकांनी माझ्यावर जितका विश्वास ठेवला, तितकाच विश्वास मीही त्यांच्यावर ठेवला.”

पुढे तो म्हणाला, “त्यांच्या चित्रपटात काम करताना मी त्यांना कधीच प्रश्न विचारले नाहीत. ते म्हणायचे हा सीन करायचा आहे, हे असं करायचं आणि अॅक्शन…! मी फक्त त्यांना फॉलो केलं. एखादा चित्रपट हिट होणं किंवा फ्लॉप होणं हे सुरूच असतं. पण यामुळेच आयुष्याचा एक आलेख बनतो, नाहीतर आपले आयुष्य अगदी सरळ असते.”

हेही वाचा : सिद्धार्थ मल्होत्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा माझा…”

व्यवसायिकप्रमाणेच गेल्या काही दिवसात सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बरेच काही बोलले जात होते. तो आणि कियारा अडवाणी लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र यावर भाष्य करत सिद्धार्थने त्या सगळ्या अफवा असल्याचा खुलासा केला होता.

Story img Loader