अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. काही वर्ष कियारा व सिद्धार्थने एकमेकांना डेट केलं. त्यानंतर या सेलिब्रिटी कपलने लग्न करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. दोघांनी या लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. कियारा व सिद्धार्थच्या व्हायरल फोटोंमध्ये ते दिसून आलं.
कियारा-सिद्धार्थच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर
कियारा व सिद्धार्थच्या लग्नामध्ये सगळं काही खास होतं. दोघांच्या लग्नाबाबत बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. लग्नादरम्यानचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होऊ नये म्हणून सुरक्षा वाढवण्यात आली. कियारा व सिद्धार्थचं लग्न नेमकं कसं झालं हे पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर झाले होते. अखेरीस कियाराने लग्नाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये कियारा व सिद्धार्थ एकमेकांना हार घालताना दिसत आहे. तर कियाराने अगदी आनंदाने नाचत एण्ट्री केली असल्याचं पाहायला मिळालं. कियारा व सिद्धार्थ यांनी एकमेकांना हार घालताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. तसेच कियारा व सिद्धार्थने एकमेकांना किस केलं.
कियाराने शेअर केलेल्या या व्हिडीओ काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. दोघंही या व्हिडीओमध्ये सुंदर दिसत आहेत. तसेच त्यांच्या लग्नाचा राजेशाही थाट व्हिडीओमध्ये दिसून येतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटी मंडळी कमेंट करत आहेत. तर माझ्या डोळ्यात पाणी आलं असं रकुल प्रीत सिंगने कमेंट करत म्हटलं आहे.