बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीची लगीनघाई सुरू आहे. कियारा व सिद्धार्थ ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा व सिद्धार्थचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कियारा-सिद्धार्थच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत.
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना आजपासून सुरुवात होणार आहे. संगीत सोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे. त्याबरोबरच सिद्धार्थ-कियाराचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ-कियारा बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ‘फिल्मवाला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा>> लगीन घटिका समीप आली! ‘असा’ आहे सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा शाही थाट, विवाहस्थळाचे Inside Videos व्हायरल
सिद्धार्थ-कियाराच्या डान्सचा व्हिडीओ हा त्यांच्या संगीत सोहळ्यातील नसून एका पार्टीतील आहे. लग्नाला अवघे काही तास शिल्लक असताना सिद्धार्थ व कियाराचा एकत्र डान्स करतानाचा हा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा>> सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीला रद्द करावा लागला हनिमून, ‘हे’ आहे कारण
सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमधील ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. याशिवाय पाहुण्यांसाठी ४० गाड्या व सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली आहे. आलिशान पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियारा कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेणार आहेत.