सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जाते. या दोघांची ऑनस्क्रीन आणि त्याप्रमाणेच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही कायम चर्चेत असते. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. तेव्हापासून ही दोघे एकमेकांना डेट करू लागले. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या सातव्या सीझनमुळेही त्यांच्या प्रेमाच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे कधीही काहीही सांगितले नाही. आता एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्यांचे नाव चर्चेत आले आहे. या व्हिडीओमुळे त्यांनी गपचूप लग्न उरकल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा : ‘या’ रंगांचे कपडे परिधान करणे टाळतात अमिताभ बच्चन, ड्रेस डिझायनरने कारण देत केला खुलासा

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच

अलीकडेच, सिद्धार्थ आणि कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यात सिद्धार्थ आणि कियाराचा खास बॉण्ड दिसत आहे. सिद्धार्थ-कियारा यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्याने तयार केलेल्या अकाऊंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सर्वत्र आहे. त्यांनी घातलेले कपडे आणि त्यांची व्हिडीओतील केमिस्ट्री बघून चाहत्यांनी त्या दोघांनी लग्न केले असे समजून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली.

परंतु सिद्धार्थ आणि कियाराचा हा न पाहिलेला व्हिडिओ एका कपड्याच्या जाहिरातीतील शूटदरम्यानचा आहे. या व्हिडीओत दोघेही पारंपरिक कपड्यांमध्ये दिसत आहेत. जाहिरातीच्या शूट क्लिपमध्ये कियारा सिद्धार्थकडे प्रेमाने पाहत आहे. या दोघांची व्हिडीओतील केमिस्ट्री इतकी पक्की आहे की नेटकऱ्यांनी त्यांना विवाहित जोडपे म्हणून घोषित केले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले, “ते विवाहित जोडप्यासारखे दिसत आहेत.” तर दुसऱ्याने लिहिले, “हे दोघे लग्नाआधीच लग्नाच्या माहोलची झलक दाखवत आहेत.” तर अनेकांनी या व्हिडीओवर “अभिनंदन” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : सिद्धार्थ मल्होत्राचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, “‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा माझा…”

सध्या दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ‘शेरशाह’ चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एका सैनिकाचे पात्र साकारणार आहे. करन जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘योद्धा’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ सैन्यातील एका जवानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. तर कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्वांस या मराठमोळ्या दिग्दर्शकावर आहे.

Story img Loader