बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. जानेवारी २०२३ मध्ये कियारा व सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. लग्नासाठी ते वेडिंग वेन्यूही शोधत असल्याची चर्चा रंगली होती. आता सिद्धार्थ व कियाराच्या लग्नाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या एका जवळच्या मित्राने याबाबत खुलासा केला आहे. ईटाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. “मला सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती नाही. मला किंवा कोणलाही अद्याप त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही मिळालेली नाही. त्यांचं लग्न होत नाही आहे. हा कोणाच्या तरी स्वप्नातला लग्नसोहळा आहे”, असं जवळच्या व्यक्तीने ईटाइम्सला सांगितलं आहे.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav
“माझ्या वडिलांचा विरोध…”, सोनाली अन् अभिषेक गावकरने सांगितला लव्ह स्टोरीचा रंजक किस्सा
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first kelvan
‘कोकण हार्टेड गर्ल’ची लगीनघाई! अंकिता-कुणालचं पार पडलं पहिलं केळवण, फोटो आला समोर, लग्नपत्रिका पाहिलीत का?

हेही वाचा>> Video: क्लासिक इंटेरिअर, प्रशस्त हॉल अन् खिडकीतून दिसणारी मुंबई; सिद्धार्थ-मितालीने असं सजवलं त्यांच्या स्वप्नातलं घर

पुढे तो म्हणाला, “सिद्धार्थ व कियारा एवढ्यात लग्न करणार नाही आहेत. जर हे सिक्रेट वेडिंग असेल, तर कदाचित ते फक्त त्या दोघांनाच माहीत असेल. पण जर हे सिक्रेट वेडिंग आहे, तर माध्यमांना याबाबत माहिती कशी मिळाली? माध्यमांनी त्यांच्या लग्नाची गेस्ट लिस्टही तयार केली आहे. सिद्धार्थ व कियाराच्या जवळच्या व्यक्ती सगळ्यांना ठाऊक आहेत. त्यामुळे या लिस्टमध्ये करण जोहरचं नाव येणं साहजिकच आहे”.

हेही पाहा>> Photos: ‘मुरांबा’ फेम रमाचं हॉट फोटोशूट, साडीतील कातिल अदांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

कियारा व सिद्धार्थने ‘शेरशाह’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या ऑन स्क्रीन जोडीला चाहत्यांनीही पसंती दर्शविली होती. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंग व लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Story img Loader