सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर हे दोघं ७ फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाली आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. आता त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच सिद्धार्थ मल्होत्राची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्ट हिने त्या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला आता सिद्धार्थ मल्होत्राने प्रतिक्रिया दिली आहे.
५,६ आणि ७ फेब्रुवारी रोजी या दोघांचं लग्न जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये धुमधडाक्यात पार पडलं. ५ तारखेला मेहंदी, ६ फेब्रुवारीला हळद आणि संगीत समारंभ पार पडला. तर ७ फेब्रुवारीला दुपारी ही दोघं लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर सर्व सेलिब्रेटींनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. तर आलिया भट्टने देखील त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत एक खास कॅप्शन लिहिली होती.
आणखी वाचा : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीला रद्द करावा लागला हनिमून, ‘हे’ आहे कारण
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत आलियाने लिहिलं, “तुम्हा दोघांचं खूप अभिनंदन..!” आता सिद्धार्थ मल्होत्राने ती स्टोरी रिपोस्ट करत त्याला रिप्लाय दिला आहे. आलियाची स्टोरी रिपोस्ट करत सिद्धार्थने लिहिलं, “थँक यू आलिया…” आता त्याची ही स्टोरी चर्चेत आली आहे. ब्रेकअप नंतरही त्यांच्यात असलेली घट्ट मैत्री पाहून त्यांचे चाहते खुश झाले आहेत.
हेही वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर
दरम्यान आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात एकत्र काम केलं. हा या दोघांचाही पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील आलिया आणि सिद्धार्थची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली. तर या चित्रपटानंतर काही वर्ष दोघं एकमेकांना डेट करत होती. मात्र काही कारणाने त्यांना त्यांचे रस्ते वेगळे करावे लागले.