बॉलिवूडमधला चॉकलेट हिरो अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा. नुकतीच त्याने बॉलिवूडमध्ये १० वर्षे पूर्ण केली आहेत. सिद्धार्थने २०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये त्याच्याबरोबर वरुण धवन आणि आलिया भट्ट यांनीही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अलीकडेच सिद्धार्थने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा त्याचा पहिला चित्रपट नव्हता, असा खुलासा केला आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : राखी सावंतला बनायचे आहे मुख्यमंत्री, पद मिळाल्यावर सर्वात आधी करणार ‘हे’ काम

नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने सांगितले की, त्याचा पहिला दिग्दर्शक करण जोहर नसून अनुभव सिन्हा होता. सिद्धार्थ मल्होत्राने अनुभव सिन्हा दिग्दर्शित एका चित्रपटासाठी ऑडिशन दिली. त्या चित्रपटातून त्याच्यासोबत आणखी दोन कलाकार लॉन्च होणार आहेत, असे त्याला सांगण्यात आले. मात्र, हा चित्रपट काही कारणाने राखडला.

सिद्धार्थ मल्होत्राने सांगितले की, “अभिनय आणि डान्स वर्कशॉपला जाण्यापूर्वी तसेच स्वतःच्या शरीरावर काम करण्यापूर्वी मी चित्रपटाची वाट पाहण्यात एक वर्ष घालवले. त्यानंतर हा चित्रपट बनणार नाही असे वाटल्यावर मी करार संपवत असल्याचा निर्णय त्या चित्रपटाच्या टीमला दिला.” यानंतर तो अनुभव सिन्हा यांच्याशी कधीच बोलला नाही. पण संधी मिळाल्यास तो त्यांच्याबरोबर नक्कीच काम करेल, असेही सिद्धार्थ म्हणाला.

हेही वाचा : अभिनेता अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत? नव्या चित्रपटाच्या पोस्टरची सर्वत्र चर्चा

दरम्यान सिद्धार्थ आता त्याच्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. या चित्रपटात तो अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या व्यतिरिक्त सिद्धार्थ राशी खन्ना आणि दिशा पटानीसोबत ‘योधा’ आणि रश्मिका मंदानाबरोबर ‘मिशन मजनू’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.