बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी (५जून) रिलीज करण्यात आला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर पापाराझींनी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राला पाहिले. सिद्धार्थला कियाराच्या नावाने चिडवत पापाराझींनी त्याला ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर रिलीज झाल्याची आठवण करून दिली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, सिद्धार्थने कार्तिक-कियाराच्या चित्रपटाचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नवाजुद्दीनच्या पत्नीने केला ‘मिस्ट्री मॅन’बद्दल खुलासा; ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत म्हणाली, “आमचं नातं मैत्रीपेक्षा…”

‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर पापाराझींनी सिद्धार्थला “भाई… भाभी का ट्रेलर आया है, बहुत अच्छा है” असे म्हणून चिडवले यानंतर सिद्धार्थ काहीसा लाजला आणि कॅमेरासमोर पोज देत तिथून निघून गेला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी बॉलीवूडमधील या लोकप्रिय जोडीने ७ फेब्रुवारी २०२३ ला लग्नगाठ बांधली होती.

हेही वाचा : “वडिलांवर उचलला हात, मृत्यूसाठी केली प्रार्थना …” ‘रोडीज’मध्ये तरुणीने केला धक्कादायक खुलासा, गॅंग लीडर्स झाले निशब्द…

सिद्धार्थने मल्होत्राने ‘सत्यप्रेम की कथा’चा ट्रेलर आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत कार्तिक-कियारासह संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. सिद्धार्थ म्हणाला, “ट्रेलर खूप सुंदर आहे की (कियाराला की असे म्हटले आहे), चित्रपटात तू साकारलेल्या ‘कथा’ पात्राला पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. ‘सत्यप्रेम की कथा’च्या संपूर्ण टीमला आणि कार्तिक आर्यनला माझ्या अनेक शुभेच्छा”

कार्तिक -कियाराची जोडी यापूर्वी ‘भूल भुलैया २’ मध्ये दिसली होती. तेव्हा प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री खूप आवडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कार्तिक- कियारा सत्यप्रेम व कथा म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये गजराज राव व सुप्रिया पाठक कार्तिकच्या पालकांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra adorable reaction to wifey kiara advani satyaprem ki katha trailer sva 00