सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकले. तेव्हापासून हे कपल चांगलंच चर्चेत आहे. नुकताच सिद्धार्थचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो लग्नानंतरच्या जीवनाबाबत सांगताना दिसतं आहे. यावेळेस सिद्धार्थनं पत्नी कियाराला ‘जीवनातील मौल्यवान खजिना’ची उपमा दिली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्रावर पेजवर सिद्धार्थचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच सिद्धार्थ जीवनातला सर्वात मौल्यवान खजिना कियारा असल्याचं सांगताना दिसत आहे. तसंच तो पुढे म्हणतो की, “आताच लग्न झालं. मी खूप आनंदी आहे. लग्न हा एक खेळ आहे. हा खेळ आम्ही आमच्या आयुष्यात दोघंजण रोज खेळतो. गेल्या काही महिन्यात मला हे देखील समजलंय की, लग्नानंतर कधी ‘मी किंवा माझं’ असं नसतं. तेव्हा फक्त ‘आपलं’ असं असतं. हेच लग्नानंतरचं जीवन असतं.”

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”
Akshay Kumar
“लैंगिक शिक्षणावर चित्रपट करण्याची कुणाची हिंमत आहे का?” सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांवर बोलताना अक्षय कुमारचा प्रश्न

हेही वाचा – ओटीटीवर पदार्पण करणारी नर्गिस फाखरी चर्चेत; म्हणाली, “मी कोणत्याही प्रोजेक्टसाठी नग्न…”

हेही वाचा – महेंद्रसिंग धोनीच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? ‘या’ दिवशी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

सिद्धार्थच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, ‘ईश्वराचे आशीर्वाद सदैव तुमच्या दोघांवर असू दे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं सिद्धार्थ-कियाराला त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – अभिनेते गिरीश कुलकर्णी सोशल मीडियाचा वापर का करत नाहीत? म्हणाले, “फॉलो…”

दरम्यान, सिद्धार्थ व कियारानं ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि त्यावेळेस दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. अलीकडेच ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी कियारा सिद्धार्थबाबत म्हणाली की, “मी खूप नशीबवान आहे. कारण जो माझा जोडीदार आहे, ज्याला मी माझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी निवडलं आहे, जो माझा नवरा आहे, तोच माझा सर्वात चांगला मित्र आहे. तो माझ्यासाठी सर्वकाही आहे.”

Story img Loader