बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतर काही कार्यक्रमांमध्ये दोघं एकत्र दिसले. अलिकडेच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये सिद्धार्थ कियाराने सर्वांसमोर पती-पत्नी म्हणून हाक मारत चाहत्यांची मनं जिंकली. आता सिद्धार्थ मल्होत्राचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच एका ऑफिसबाहेर स्पॉट झाला. त्यावेळी पापाराझींनी सिद्धार्थला काही प्रश्न केले आणि त्यांच्या हटके अंदाजात सिद्धार्थने उत्तरही दिली. सिद्धार्थने यावेळी हसत हसत काही चाहत्यांबरोबर फोटोसाठी पोजही दिल्या. पण जेव्हा फोटोग्राफर्सनी सिद्धार्थला काही सिंगल फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली आणि त्यावर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळेच हसू लागले.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Lakaht Ek Aamcha Dada
Video : “गावासमोर धिंड काढली नाही, तर…”, तुळजाचे डॅडींना चॅलेंज; नेटकरी सल्ला देत म्हणाले, “काहीही करून तुमचं नातं…”

आणखी वाचा- “मी खूप नाटक करते पण राजकारण…”, सून ऐश्वर्या रायबद्दल स्पष्टच बोलल्या जया बच्चन

पापाराझींनी केलेल्या विनंतीनंतर सिद्धार्थ मल्होत्रा थोडासा लाजला आणि म्हणाला, “आता मी सिंगल राहिलेलो नाही.” अभिनेत्याचं हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्व फोटोग्राफर्सना हसू अनावर झालं. व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ रेड-ब्लू रंगाच्या चेक्स शर्ट आणि जीन्समध्ये खूपच हॅन्डसम दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. सर्वजण सिद्धार्थचं कौतुक करत आहेत.

सिद्धार्थचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते यावर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, ‘लग्नानंतर सिड अधिक हॅन्डसम झाला आहे.’ आणखी एका चाहत्याने लिहिले की, सिद्धार्थला पती म्हणून पाहणे ही आतापर्यंतची सर्वात चांगली गोष्ट आहे. तो सर्वोत्तम पती आहे, यात शंका नाही. तर दुसर्‍याने लिहिलं, “आये हाय…..दिल जीत लिट्टा मुंडे ने.” दरम्यान सिद्धार्थ मल्होत्राने गेल्या महिन्यात जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये कियारा अडवाणीशी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे.

Story img Loader