बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’मुळे चर्चेक आहे. सिद्धार्थ मागच्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. त्यासाठी तो वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये सहभागी होताना दिसतोय. नुकताच तो एका फॅशन वीकमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ताला प्रेझेंट केलं. तो त्याच्यासाठी शो स्टॉपर होता. पण सिद्धार्थने रॅम्पवर येताच असं काही केलं की गौरव गुप्ताही हैराण झाला. सिद्धार्थचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.

सिद्धार्थ मल्होत्राचा फॅशन वीकमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ आणि गौरव एकत्र फोटो क्लिक करण्यासाठी पोज देताना दिसत आहेत. पण अशातच सिद्धार्थने अचानक त्याचा गॉगल काढून घेतला आणि स्वतःच्या डोळ्यांवर चढवला. सिद्धार्थ काय करतोय हे गौरवला समजण्याआधीच त्याने पोज द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा तर तो हे सगळ पाहून हैराण झाला आणि नंतर हसू लागला.

आणखी वाचा- “आम्ही हे सगळं कधीच..” कियाराशी लग्न करण्याच्या चर्चांवर सिद्धार्थ मल्होत्राने सोडलं मौन

जेव्हा सिद्धार्थ मल्होत्राने गौरवकडून अचानक गॉगल काढून घेतल्यावर पहिल्यांदा त्याला काही समजलं नाही. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने तो परत मागितला. यानंतर जेव्हा सिद्धार्थ आणि गौरव परत जाऊ लागले तेव्हा गौरवने क्षणाचाही विलंब न लावता स्वतःचा गॉगल परत घेतला. गॉगलसाठी दोघांची मस्ती पाहून उपस्थितांनाही हसू आवरणं कठीण झालं.

आणखी वाचा- ..अन् कियाराचं नाव घेताच लाजला सिद्धार्थ मल्होत्रा, ‘झलक दिखला जा’मधला व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान, ‘शेरशाह’ चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारणारा सिद्धार्थ मल्होत्रा ​​नुकताच ‘मां भारती के सपूत’ वेबसाइट लॉन्चिंगला पोहोचला. यावेळी तो म्हणाला, ‘लष्कराचे जवान सीमेवर आपल्यासाठी प्राण देतात. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाची काळजी घेणे ही आपलीही जबाबदारी आहे. आपलं सैन्य जगातील सर्वोत्कृष्ट सैन्यदलापैकी एक आहे आणि त्यांचं काम आपल्या सर्वांपेक्षा कठीण आहे.

Story img Loader