बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ही जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये कियारा व सिद्धार्थचा शाही विवाहसोहळा पार पडला. सिद्धार्थ-कियाराच्या विवाहसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सिद्धार्थ-कियाराच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नानंतर सिद्धार्थ-कियारा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आले. एअरपोर्टवर त्यांना स्पॉट करण्यात आलं आहे. विरल भय्यानीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ-कियाराची या नवविवाहित जोडप्याची झलक पाहायला मिळत आहे. सिद्धार्थने जीन्स, टी-शर्ट व जॅकेट असा पेहराव केला आहे. तर साधेपणातही नववधू कियाराचं सौंदर्य खुलून आलेलं दिसत आहे. बॉलिवूडमधील या नव्या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हेही वाचा>>Video: आधी अफेअर आता आदिल खानच्या पहिल्या लग्नाबाबत राखी सावंतचा खुलासा, म्हणाली…
कियाराने पँटसूट परिधान करत अंगावर शाल घेतल्याचं दिसत आहे. नववधू कियाराच्या भांगेत कुंकू तर हातात चुडाही आहे.कियाराने गळ्यातील मंगळसूत्रही फ्लाँट केल्याचं दिसत आहे. लग्नानंतर कियाराच्या या लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत कियारा व सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा>> टर्कीतील भूकंपात हजारो बळी, बॉलिवूडकरही हळहळले; फोटो शेअर करत आलिया भट्ट म्हणाली…
सिद्धार्थ-कियारा शेरशाह चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसले होते. या चित्रपटात त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. चाहत्यांनाही त्यांची ऑनस्क्रीन जोडी पसंत पडली होती. त्यानंतर अनेक काळ ते रिलेशनशिपमध्ये होते. आता सिद्धार्थ-कियारा लग्नबंधनात अडकल्यामुळे चाहतेही खूश आहेत.