बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडयावर सातत्याने चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या काही काळापासून होताना दिसत आहेत. नव्या वर्षात हे दोघं लग्न करू शकतात असं काही दिवसांपूर्वीच बोललं जात होतं त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाचं ठिकाण आणि तारीख याबाबत खुलासा झाला आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू होत्या. काही रिपोर्ट्समध्ये तर त्यांच्या लग्नाची गेस्ट लिस्टही देण्यात आली होती. मात्र नंतर या दोघांनी असं काहीच होत नसल्याचं स्पष्टीकरण प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र आता ‘इ-टाइम्स’ने कियारा-सिद्धार्थच्या लग्नाबाबत महत्त्वाचे अपडेट्स शेअर केले आहेत.

आणखी वाचा- “जेव्हा मी लग्न करेन तेव्हा आलिया…” सिद्धार्थच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल कियारा आडवाणीचं मोठं वक्तव्य

‘इ-टाइम्स’ला कियारा-सिद्धार्थच्या जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही ६ फेब्रुवारी २०२३ ला लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. तर लग्नाच्या आधीचे मेहंदी, हळद, संगीत यांसारखे कार्यक्रम आणि विधी ४ आणि ५ फेब्रुवारीला होणार आहेत. या कार्यक्रमांना कियारा आणि सिद्धार्थचे नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित असणार आहे. तर सिद्धार्थ आणि कियारा राजस्थानच्या जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये सप्तपदी घेणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.

आणखी वाचा- “सलमान खानला ओळखत असले तरी…”, करिअरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगताना कियारा अडवाणी भावूक

दरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांपैकी कोणीही या वृत्ताची पुष्टी अद्याप केलेली नाही. सध्या हे दोघंही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दुबईला गेलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राने त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

Story img Loader