अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता या नवविवाहित जोडप्याने मुंबईतील त्यांच्या कुटुंबिय आणि मित्र-परिवारासाठी ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले आहे. या ग्रँड रिसेप्शनला बॉलिवूडमधील सर्वच कलाकार उपस्थित होते. या रिसेप्शनच्यावेळी सिद्धार्थने केलेल्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराने मुंबईतील सेंट रेगिस या हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शनचे आयोजन केले होते. यावेळी काजोल, अजय देवगण, करीना कपूर, करण जोहर, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी मल्होत्रा आणि अडवाणी या दोन्ही कुटुंबियांनी फोटोग्राफर्सला पोज दिली. त्यावेळी सिद्धार्थच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
आणखी वाचा : Sidharth-Kiara Wedding: कियाराच्या मंगळसूत्राची किंमत माहितीये का? सिद्धार्थने खर्च केले तब्बल…

Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Lakhat Ek Aamcha Dada
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तेजू-शत्रूने शेअर केला व्हिडीओ; अधोक्षज कऱ्हाडेच्या कमेंटने वेधले लक्ष, म्हणाला…
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Mumbai Local Birthday Celebration
‘बार बार दिन ये आए…’ दणक्यात साजरा केला रेल्वे ग्रुपमधील सदस्याचा वाढदिवस; पाहा मुंबई लोकलचा खास Viral Video
Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल
Navri Mile Hitlarla
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’मधील एजे-लीलाच्या रोमँटिक सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ आणि कियाराचे कुटुंबिय फोटोसाठी एकत्र पोज देण्यासाठी उभे असल्याचे दिसत आहे. यावेळी सिद्धार्थचा मोठा भाऊ हा त्याच्या वडिलांची व्हिलचेअर घेऊन येताना दिसत आहे. तर सिद्धार्थ हा भावाला मध्यभागी ती व्हिलचेअर ठेवायला सांगताना दिसत आहे.

त्यावेळी सिद्धार्थ हा त्याच्या वडिलांचा कोट नीट करताना दिसतआहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्याच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. अनेकांनी सिद्धार्थची ही कृती पाहून मुलगा असावा तर असा असे म्हटले आहे. तर अनेकांनी त्या दोघांनाही आशीर्वाद दिले आहेत.

आणखी वाचा : “कॉलेजपासून…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेने स्नेहलबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन

दरम्यान बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. राजस्थानच्या जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये त्या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. सिद्धार्थ आणि कियाराने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे लग्नाचे फोटो शेअर केले होते.

Story img Loader