बॉलिवूडमधील लोकप्रिय कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सिद्धार्थ-कियारा पारंपरिक पद्धतीने जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसवर लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराच्या मुंबईतील वेडिंग रिसेप्शनची चर्चा रंगली होती.
सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडमधील सितारे अवतरले होते. लग्नाप्रमाणेच त्यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रिसेप्शन सोहळ्यासाठी सिद्धार्थने काळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला होता. तर कियाराने लाँग गाऊनमध्ये ग्लॅमरस लूक केला होता. वेस्टन लूकवर कियाराने घातलेल्या खड्यांच्या नेकलेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
हेही वाचा>> “बिग बॉसच्या घरात नमाज…” इन्स्टा लाइव्हमध्ये विजेत्या रॅपर एमसी स्टॅनचं वक्तव्य
हेही वाचा>> “आदिल मुस्लीम आहे म्हणून कितीही लग्न करु शकतो, पण…”, तिहेरी तलाकचा उल्लेख करत राखी सावंत म्हणाली “मोदीजी…”
कियाराने रिसेप्शन सोहळ्यात घातलेला नेकलेस खूप खास आहे. कियारा-सिद्धार्थच्या वेडिंग रिसेप्शनसाठी हा नेकलेस खास डिजाइन करण्यात आला होता. कियाराच्या नेकलेसमधील हिरव्या रंगाचे खडे आकर्षक दिसत होते. हे खडे झेंबियन स्टोन (Zambian green emerald stone) किंवा पन्ना(Panna) नावाने प्रसिद्ध आहेत. विनस ज्वेलरीने दिलेल्या माहितीनुसार, या हिरव्या रंगाच्या एका खड्याची किंमत तब्बल २९ हजार ९९९ रुपये इतकी आहे.
हेही वाचा>> एमसी स्टॅनच्या इन्स्टा लाइव्हचा जगातील टॉप १० लाइव्हमध्ये समावेश, एका स्टोरीसाठी रॅपर घेतो ‘इतके’ पैसे
सिद्धार्थ व कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला अजय देवगण-काजोल, आकाश अंबानी व पत्नी, आलिया भट्ट, नीतू कपूर या बॉलिवूडकरांनी चार चांद लावले. सिद्धार्थ-कियाराने रिसेप्शन सोहळ्यात कुटुंबियांसह डान्सही केला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.