बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. ७ फेब्रुवारीला सिद्धार्थ-कियाराने कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा पार पडला.

लग्नानंतर सिद्धार्थ-कियाराने मुंबईत रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं. रविवारी(१२ फेब्रुवारी) सिद्धार्थ-कियाराचा रिस्पेशन सोहळा पार पडला. सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रिसेप्शन सोहळ्यासाठी सिद्धार्थने काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला होता. तर कियाराने लाँग गाऊन व ज्वेलरीमध्ये हटके लूक केला होता. परंतु, सिद्धार्थ-कियाराचा रिसेप्शन लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलेला दिसत नाही.

हेही वाचा>> “बिग बॉस पुन्हा बघणार नाही”, एमसी स्टॅन विजेता ठरल्यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी, म्हणाले “शिव ठाकरे व प्रियांकाने मेहनत…”

‘इन्स्टंट बॉलिवूड’ पेजवरुन सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी सिद्धार्थ-कियाराला रिसेप्शन पार्टीतील लूकवरुन ट्रोल केलं आहे. “रिसेप्शन सोहळ्यात असे कपडे कोण घालतं?” अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “काहीतरी चांगले आऊटफिट घालशील असं वाटलं होतं” असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “स्वत:च्याच रिसेप्शन सोहळ्यात ते नवविवाहित जोडपं नाही तर पाहुणे वाटत आहेत”, असंही एकाने म्हटलं आहे.

sidharth kiara troll

हेही वाचा>> Bigg Boss 16: दीड कोटींची चेन, ८० हजारांचे बूट अन्…; ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅनची एकूण संपत्ती माहीत आहे का?

कियारा-सिद्धार्थच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्याला बॉलिवूड सितारे अवतरले होते. आलिया भट्ट, विद्या बालन, अजय देवगण-काजोल, भूमी पेडणेकर, आकाश अंबानी या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कियारा-सिद्धार्थच्या रिसेप्शन सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Story img Loader