बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. ६ फेब्रुवारीला सिद्धार्थ-कियारा लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे. राजस्थानमधील आलिशान पॅलेसमध्ये ते सप्तपदी घेणार असल्याची माहिती मिळाली होती. आता त्यांच्या लग्नातील सुरक्षिततेबद्दल मोठी माहिती समोर आली आहे.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ-कियाराने लग्नातील सुरक्षिततेची जबाबदारी बॉडीगार्ड यासिनकडे सोपविण्यात आली आहे. यासिन हा बॉलिवूड किंग शाहरुख खानचा एक्स बॉडीगार्ड आहे.

हेही वाचा>> Video: मंगलाष्टकं संपताच वनिता खरातला उचलून घेतलं अन्…; लग्नातील व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ-कियारा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जौहर व वरुण धवन यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

हेही वाचा>> आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी सावंतचे पतीवर गंभीर आरोप, म्हणाली “त्याने कुराणवर हात ठेवून…”

कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत. सूर्यगढ पॅलेसवरील एका दिवसाचं भाडं एक ते दोन कोटींच्या घरात आहे. ५ फेब्रुवारीपासून कियारा-सिद्धार्थच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

Story img Loader