बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. अलीकडेच कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात कियाराने कार्तिक आर्यनबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. ‘सत्यप्रेम की कथा’च्या प्रिमिअरला कियारा-सिद्धार्थ एकत्र पोहोचले होते. चित्रपट पाहिल्यानंतर सिद्धार्थने बायकोसाठी खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या

सिद्धार्थ मल्होत्राने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करीत आपल्या बायकोचे कौतुक केले आहे. कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटातील एक फोटो शेअर करीत सिद्धार्थ कॅप्शनमध्ये लिहितो की, “चित्रपटात एक सुंदर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रत्येक कलाकाराने उत्तम अभिनय केला असून ‘कथा’ या पात्राने माझे विशेष मन जिंकले आहे. कियारा, ‘कथा’ ही भूमिका तू निवडलीस म्हणून मी अत्यंत आनंदी असून, या चित्रपटातील तुझा अभिनय अतिशय प्रभावशाली आहे. कियारा अडवाणी, कार्तिक आर्यन आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा…”

हेही वाचा : “ती माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते”; नवाजुद्दीन सिद्दीकीला पाठिंबा दिल्यावरुन कंगना राणौतवर आलिया भडकली, म्हणाली…

कियारा अडवाणीने पतीने शेअर केलेली स्टोरी रिशेअर करीत “थॅंक्यू माय लव्ह…” असे कॅप्शन दिले आहे. तसेच चित्रपटाचे सगळे रिव्ह्यूज वाचून मला अतिशय आनंद होत आहे असेही कियाराने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, ‘भुल भुलैय्या २’ नंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी पुन्हा एकदा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये सुप्रिया पाठक, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तल्सानिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra shares post for kiara advani performance in satyaprem ki katha sva 00