सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘शेरशाहा’ला मिळालेल्या प्रचंड यशानंतर सिद्धार्थ लवकरच योद्धामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली असून निर्माते पुन्हा एकदा रिलीज डेटमध्ये बदल करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगांनी सांगितला ‘तो’ अनुभव, खंत व्यक्त करीत म्हणाल्या “सर्वांना ट्रॉफीबरोबर…”

सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ चित्रपट १५ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु शाहरुखचा ‘जवान’ चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याने पुन्हा एकदा रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. ‘जवान’ चित्रपटाच्या टीझरला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि ‘पठाण’नंतर शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांमधील उत्सुकता पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल, असा अंदाज बांधला जात आहे. यामुळेच ‘योद्धा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा सावध पवित्रा घेत रिलीज डेटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘योद्धा’ चित्रपट यापूर्वी २०२२ मध्ये रिलीज होणार होता. यानंतर ७ जुलै २०२३ ही तारीख निश्चित करण्यात आली परंतु यामध्येही काही कारणास्तव बदल करून निर्मात्यांनी १५ सप्टेंबर २०२३ ला चित्रपट रिलीज करायचे ठरवले होते. परंतु आता ‘जवान’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा ‘योद्धा’च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. निर्माते लवकरच नव्या रिलीज डेटचा विचार करीत असून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ‘रॉ एजेंट’ची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील ‘तो’ प्रसंग रणबीर कपूरने केला रिक्रिएट, म्हणाला, “ते दोघे एकत्र…”

दरम्यान, ‘जवान’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल केल्यापासून बॉलीवूडमधील इतर चित्रपटांचे निर्माते सतर्क झाले आहेत. ‘फुक्रे ३’, ‘जोगीरा सा रा रा रा’ आणि आता ‘योद्धा’ अशा अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra yodha release date postponed again due to shahrukh khan jawan sva 00
Show comments