Sikandar Box Office Collection Day 10: ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. प्रदर्शित होण्यासाठी ‘सिकंदर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालून बक्कळ कमाई करण्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण सलमान खान, रश्मिका मंदानाच्या चित्रपटाची जादू फिकी पडली आहे. दिवसेंदिवस चित्रपटाच्या कमाईत मोठी घट होताना दिसत आहे. १०व्या दिवशी ‘सिकंदर’ चित्रपटाने किती कमाई केली? जाणून घ्या…

आतापर्यंत ‘सिकंदर’ चित्रपटाने जगभरात २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पण भारतात यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. भारतात सतत या चित्रपटाच्या कमाई घट होत आहे. नवव्या दिवशी ‘सिकंदर’ने १.७५ कोटी कमाई केली होती. दहाव्या दिवशी यामध्ये आणखी घट झाली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, सलमानच्या बहुचर्चित चित्रपटाने १०व्या दिवशी फक्त १.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तसंच आतापर्यंत ‘सिकंदर’ने १०५.६० कोटींची कलेक्शन केलं आहे. बॉक्स ऑफिसवरील ‘सिकंदर’चं चित्र असंच राहिलं तर थोड्या दिवसांत चित्रपटगृहात सलमान हा चित्रपट नाहीसा होईल.

‘सिकंदर’ चित्रपटाची आतापर्यंतची कमाई…

पहिल्या दिवशी – २६ कोटी
दुसऱ्या दिवशी – २९ कोटी
तिसऱ्या दिवशी – १९.५ कोटी
चौथ्या दिवशी – ९.७५ कोटी
पाचव्या दिवशी – ६ कोटी
पहिल्या आठवड्यात – ९०.२५ कोटी
सहाव्या दिवशी – ३.५ कोटी
सातव्या दिवशी – ४ कोटी
आठव्या दिवशी – ४.८४ कोटी
नवव्या दिवशी – १.७५ कोटी
दहाव्या दिवशी – १.३५ कोटी
एकूण कमाई – १०५.६० कोटी

दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस न पडल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे बरेच चित्रपटगृह रिकामे दिसत आहेत. अनेक ठिकाणी ‘सिकंदर’चे शो रद्द केले जात आहे. दोन वर्षांनंतर सलमान खानच्या हा चित्रपट आल्यानंतरही चाहत्यांनी पाठ फिरवली आहे.  ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान, रश्मिका व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकले आहेत. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

‘सिकंदर’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सलमान खाननं चित्रपटाच्या कमाईबाबत भविष्यवाणी केली होती. सलमान खान म्हणाला होता की, चित्रपट चांगला असो वा वाईट, चाहते १०० कोटी पार करून टाकतात. पण, १०० कोटी ही खूप आधीची गोष्ट आहे, आता २०० कोटींचा व्यवसाय करून देतात. ‘सिकंदर’ चित्रपटाआधी २०१९ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ चित्रपटानं पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती. ४२.३० कोटींचा गल्ला या चित्रपटानं जमवला होता. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ चित्रपटानं पहिल्याच दिवशी ३६.५४ कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. तसंच याआधी कतरिना कैफ, सलमान खानच्या ‘एक था टायगर’ चित्रपटानं पहिल्या दिवशी बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटानं ३२.९३ कोटींचं कलेक्शन केलं होतं.