Sikandar Box Office Collection Day 15: सलमान खानच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. प्रदर्शनापूर्वी ‘सिकंदर’कडून अनेकांना मोठ्या अपेक्षा होत्या. हा चित्रपट १००, २०० कोटींचा आकडा अवघ्या काही दिवसांत पार करेल असं वाटतं होतं. पण, बॉक्स ऑफिसवर चित्र वेगळं पाहायला मिळालं. पहिल्या आठवड्यात ‘सिकंदर’ला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर कमाईत मोठी घट होतं गेली. आता ‘सिकंदर’ला १ कोटींची कमाई करणंदेखील कठीण झालं आहे. १५व्या दिवशी सलमान खानच्या या चित्रपटाने किती कलेक्शन केलं? जाणून घ्या…
‘सिकंदर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन ए. आर. मुरुगादॉस यांनी केलं आहे. हा अॅक्शन ड्रामा चित्रपट ३० मार्चला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत झळकली आहे. ‘सिकंदर’ला प्रदर्शित होऊन आता १५ दिवस उलटले आहेत. पण, प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. अशातच बॉक्स ऑफिसवर ‘सिकंदर’ला सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचा सामना करावा लागत आहे. १० एप्रिलला ‘जाट’ चित्रपट प्रदर्शित झाला असून तो ‘सिकंदर’पेक्षा चांगली कमाई करताना दिसत आहे. त्यामुळे आता सलमान खानच्या चित्रपटाची समस्या आणखी वाढत आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘सिकंदर’ आता लाखोंमध्ये कमाई करताना दिसत आहे. १५व्या दिवशी सलमान खान, रश्मिकाच्या या चित्रपटाने फक्त ०.५४ लाखांचं कलेक्शन केलं आहे. आतापर्यंत ‘सिकंदर’ चित्रपटाने १०९.४ कोटींची गल्ला जमवला आहे. पण, अशा परिस्थितीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती काळ टिकतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
‘सिकंदर’ चित्रपटाची आतापर्यंतची कमाई…
पहिल्या दिवशी – २६ कोटी
दुसऱ्या दिवशी – २९ कोटी
तिसऱ्या दिवशी – १९.५ कोटी
चौथ्या दिवशी – ९.७५ कोटी
पाचव्या दिवशी – ६ कोटी
पहिल्या आठवड्यातली एकूण कमाई – ९०.२५ कोटी
सहाव्या दिवशी – ३.५ कोटी
सातव्या दिवशी – ४ कोटी
आठव्या दिवशी – ४.७५ कोटी
नवव्या दिवशी – १.७५ कोटी
दहाव्या दिवशी – १.५ कोटी
अकराव्या दिवशी – १.३५ कोटी
बाराव्या दिवशी – ०.७ लाख
दुसऱ्या आठवड्यातली एकूण कमाई – १७.५५ कोटी
तेराव्या दिवशी – ०.३ लाख
चौदाव्या दिवशी – ०.४ लाख
पंधराव्या दिवशी – ०.५४ लाख
एकूण कमाई – १०९.०४ कोटी
दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. तसंच ‘बाहुबली‘ चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.