बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहेत. ऐश्वर्या व अभिषेक यांच्या घटस्फोटाबद्दलही खूप बोललं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासह दिसली नाही आणि त्यामुळे या कुटुंबात सगळं आलबेल नसल्याचा अंदाज लोक वर्तवत आहेत.
ऐश्वर्याचे चाहते अनेकदा अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावर टीका करतात, कारण त्यांना वाटतं की बिग बी व त्यांच्या पत्नी मुलगी आणि सून यांच्यात भेदभाव करतात. आता इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेने अमिताभ बच्चन यांच्यावर ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या व्हायरल व्हिडीओवर सिमी गरेवालने केलेल्या कमेंटने लक्ष वेधले आहे.
हा व्हिडीओ ‘जागरूक जनता’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर ऐश्वर्याचे चाहते बच्चन कुटुंबावर टीका करणाऱ्या कमेंट्स करत आहेत. यापैकी एक कमेंट सिमी गरेवालची आहे.
व्हिडीओतील महिला काय म्हणाली?
व्हिडीओमध्ये महिला म्हणते, ‘सूनेसाठी वेगळे नियम आणि मुलीसाठी वेगळे. जेव्हा मी बच्चन साहेबांचा हा दुटप्पीपणा पाहते तेव्हा मला खूप वाईट वाटतं कारण मी त्यांची खूप मोठी चाहती होते. मी त्यांच्या विचारांची आणि वागण्याची खूप मोठा चाहती होते. पण जेव्हा मुलगी आणि सूनेचा विषय येतो तेव्हा मला खूप वाईट वाटतं, कारण बच्चन साहेब त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मुलीशी संबंधित पोस्ट टाकतात आणि ते त्यांच्या मुलाच्या १० वर्षे जुन्या फोटोंचे कौतुक करतात. पण ऐश्वर्या रायला पुरस्कार मिळाल्यावर तिच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. त्यामुळे सुंदर असणं, सुशिक्षित असणं या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, जेव्हा तुम्ही एखाद्या घराची सून होता तेव्हा फक्त सून बनून राहता.’ याबाबत महिलेने लोकांची मतही विचारली आहेत.
रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”
सिमी गरेवालची कमेंट
या पोस्टवर काही लोकांनी व्हिडीओतील महिला बरोबर बोलतेय अशा कमेंट्स केल्या आहेत. ऐश्वर्याचे कुटुंब तिला साथ देत नाही, असं काही म्हणत आहेत. “तुम्हाला काहीच माहीत नाही, बंद करा हे सगळं”, अशी कमेंट यावर सिमी गरेवालने केली.
नुकताच ऐश्वर्या रायला SIIMAमध्ये (साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स) अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी तिच्याबरोबर लेक आराध्या होती, पण अभिषेक बच्चन किंवा कुटुंबातील इतर कोणीही नव्हतं, त्यामुळे पुन्हा एकदा अभिषेक व ऐश्वर्याच्या नात्याबद्दल चर्चा होत आहेत.