‘विथ यू’, ‘समर हाय’, ‘ड्रॉपटॉप’, ‘ब्राउन मुंडे’, अशा अनेक गाण्यांनी तरुणाईंना वेड लावणारा गायक एपी ढिल्लों सध्या चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचं चांगलं कारण नाही. एपी ढिल्लोंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमधील त्याच्या कृतीमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी कोचेला २०२४ फेस्टिव्हलमध्ये एपी ढिल्लोंचा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लोंने गिटार स्टेजवर जोरजोरात आपटून फोडली. त्याच्या याच हैराण करणाऱ्या कृतीमुळे नेटकरी ट्रोल करत आहेत. एपी ढिल्लोंला अनेकांनी फटकारलं आहे.

हेही वाचा – Video: “गद्दारी केल्याचा बदला…”, जान्हवी कपूरच्या ‘उलझ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, अभिनेत्री झळकणार एका वेगळ्या भूमिकेत

एपी ढिल्लोंच्या या व्हायरल व्हिडीओवर एका नेटकरीने लिहिलं आहे, “मला हे अपमानजनक वाटतं आहे. अशी कृती करण्यामागचं नेमकं कारण माहित नाही. पण रोजी रोटीची इज्जत करणं, ही कधी फॅशन होऊ शकत नाही.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “बॉयकॉट एपी ढिल्लों.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुम्ही संगीताचा आदर करत नसाल तर तुम्ही कलाकार नाही. निराशाजनक.” तर चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुम्ही ज्या साधनांचा वापर करून कमाई करत आहात त्या साधनांचा तुम्ही आदर करू शकत नसालं तर लवकरच ते साधन तुमचा अनादर करू लागेल.”

हेही वाचा – सुधीर फडके यांचं ‘हे’ गाणं ऐकून रडले होते लालकृष्ण अडवाणी, राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

दरम्यान, एपी ढिल्लोंचं पूर्ण नाव अमृतपाल सिंह ढिल्लों आहे. एपी इंडो-कॅनेडियन गायक, रॅपर आणि पंजाबी बऱ्याच गाण्यांचा प्रोड्यूसर आहे. जागतिक पातळीवर एपी ढिल्लोंच्या गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. परदेशात त्याला दमदार परफॉर्मन्स ओळखले जाते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer and rapper ap dhillon trolled for breaking guitar on stage in live concert pps