गायक आणि रॅपर हनी सिंग त्याच्या नवीन म्युझिक अल्बम ३.०मुळे चर्चेत आहे. सध्या तो त्याच्या अल्बमचे जोरदार प्रमोशन करत आहे. बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने रॅप कल्चर रुजवणारा हनी सिंगला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मध्यंतरी बरीच वर्षं हनी सिंग बायपोलर डिसऑर्डर मुळे इंडस्ट्रीपासून लांब होता. आता पुन्हा जोरदार कमबॅक करण्यासाठी हनी सिंग सज्ज आहे.

नुकतंच यूट्यूबर राज शमानीबरोबर पॉडकास्टमध्ये हनी सिंगने त्याच्या करिअरबद्दल, त्याच्या खासगी आयुष्याबद्दल, त्याने केलेल्या चुकांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. या पॉडकास्टमध्ये प्रथमच हनी सिंगने पंजाबमध्ये असताना तयार केलेल्या ‘माफिया मुंडीर’ या प्लॅटफॉर्मबद्दल भाष्य केलं आहे. पंजाबच्या संगीतविश्वात काम करत असताना हनी सिंगने ‘माफिया मुंडीर’ या नावाने एका खुल्या मंचाची स्थापना केली होती. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे रॅपर्स, गायक येऊन त्यांची कला सादर करायचे, कलेची विचारांची देवाणघेवाण व्हायची.

Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर

आणखी वाचा : अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ‘सडक २’ फेम अभिनेत्रीला दुबईत अटक; कुटुंबियांकडून फसवणुकीचा दावा

‘माफिया मुंडीर’ हे नाव सुचण्यामागची हनी सिंगने एक गोष्ट सांगितली. तो या मुलाखतीमध्ये म्हणाला की माफिया आणि रस्त्यावर फिरणारे गँगस्टर्स यात खूप फरक असतो. माफियामधील लोकं ही पद्धतीशीरपणे, शिस्तबद्धपद्धतीने त्यांची कामं करतात. त्या गुन्हेगारी विश्वाचा नव्हे तर त्यांच्या शिस्तबद्धतेचा हनी सिंग फॅन होता आणि तीच शिस्तबद्धता आपल्या संगीतक्षेत्रात यावी यासाठी त्याने ‘माफिया’ हे नाव ठेवल्याचं स्पष्ट केलं.

माफिया विश्वावर बेतलेला ‘द गॉडफादर’ या चित्रपटापासून प्रेरणा मिळाली का? या प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमध्ये हनी सिंगने दिलं. तो म्हणाला, “माझ्यामते गॉडफादर हा अत्यंत टुकार आणि फालतू चित्रपट आहे. मला अल पचीनोचे ‘स्कारफेस’ आणि ‘कार्लीतोज वे’ हे दोन चित्रपट प्रचंड आवडतात. त्यातलं माफिया विश्व हे खूप वेगळं आहे. भारतात त्या धाटणीचा एकच चित्रपट बनला तो म्हणजे विशाल भारद्वाज यांचा ‘मकबुल’. आजवर भारतात तसा चित्रपट बनलेला नाही.”