एका युट्यूबर अरमान मलिकची सध्या चांगलीच चर्चा आहे. आधी अरमान मलिक म्हटलं की गायक अरमान मलिक आठवायचा, पण आता गुगलवर अरमान मलिक असं सर्च केलं तर त्याऐवजी एका युट्युबरचे फोटो आणि बातम्या दिसतात. हा युट्यूबर सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. त्याच्या दोन पत्नी असून दोघीही गरोदर आहे. या अरमान मलिकवर आता गायक अरमान मलिकने पहिल्यांदाच संताप व्यक्त केला आहे.
अरमान मलिकने एक ट्वीट केलंय आणि त्या युट्यूबर अरमानचा समाचार घेतला आहे. “त्याला अरमान मलिक म्हणणं बंद करा, त्याचे खरं नाव संदीप आहे. माझ्या नावाचा इतका दुरुपयोग पुरेसा आहे. सकाळी उठल्यावर अशा बातम्या वाचून वैताग येतो,” असं अरमानने म्हटलं आहे.
अरमानच्या या ट्वीटवर त्याचे चाहते प्रतिक्रिया देत आहेत. त्याच्या ट्वीटला उत्तर देताना अरमान मलिकच्या चाहत्यांनीही त्याला पाठिंबा दिला आणि युट्यूबरवर संताप व्यक्त केला आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की जेव्हा जेव्हा ते त्यांच्या आवडत्या गायकाबद्दल शोधण्याचा प्रयत्न करतात तेव्हा या अरमान मलिकशी संबंधित बातम्या येऊ लागतात.
युट्यूबर अरमान मलिकचं खरं नाव संदीप आहे, तो आधी टिकटॉकर होता. त्याने आधी पायलशी लग्न केलं होतं, त्यांना मुलगा झाला आणि नंतर तो त्याच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला. मग अरमानने इस्लाम धर्म स्वीकारला आणि कृतिकाशी दुसरं लग्न केलं आणि स्वतःचं नाव अरमान मलिक ठेवलं. सध्या त्याच्या दोन्ही बायका गरोदर आहेत. त्याची पहिली पत्नी पायल जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. पायल आणि कृतिकाच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अरमानचं नाव चर्चेत आलं होतं.