प्रसिद्ध बॉलीवूड गायक अरमान मलिकने नुकताच साखरपुडा उरकला आहे. अरमानने साखरपुडा सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. गेली अनेक वर्ष गायक आशना श्रॉफबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनीही २८ ऑगस्टला हे फोटो शेअर केले. सध्या बॉलीवूडमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
हेही वाचा : फोटोतील ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये साकारते महत्त्वाच्या भूमिका
अरमान मलिकने साखरपुड्याचे फोटो शेअर करत “आमच्या कायम एकत्र राहण्याच्या प्रवासाला आजपासून सुरुवात झाली आहे” असे कॅप्शन दिले आहे. या फोटोंमध्ये अरमान आशनाला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना आणि हातात अंगठी घालताना दिसत आहे.
हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीला ‘नवरा मिळाला’; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
अरमान मलिकने ‘जेहर’, ‘बोल दो ना जरा’, ‘पहेला प्यार’, ‘मुझको बरसात बना लो’, ‘मैं रहूँ या ना रहूँ’ अशी अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. तसेच आशना ही व्यवसायाने युट्यूब ब्लॉगर असून ती सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. आशना फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित व्हिडीओ बनवते. आशनाचा जन्म ४ ऑगस्ट १९९३ रोजी झाला, तर अरमानचा जन्म २२ जुलै १९९५ ला झाला आहे. आशना अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
हेही वाचा : Video : “अक्षयाची पहिली मंगळागौर…”, पाठकबाईंच्या हातावर रंगली राणादाच्या नावाची मेहंदी, पाहा खास झलक
अरमान आणि आशनाचे ईशा गुप्ता, झरीन खान, नीती मोहन, तारा सुतारिया, अहाना कुमरा, वरुण धवन, इशान खट्टर, रिया चक्रवर्ती यांनी अभिनंदन केले आहे. दोघांचे रोमॅंटिक फोटो पाहून नेटकऱ्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.